Sourav Ganguly : माजी कर्णधार सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. रॉजर बिन्नीच्या रूपाने बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळाला आहे. रॉजर बिन्नी हे 1983 च्या विश्वचषक विजेता संघाचे सदस्य होते. ते आता बीसीसीआयचे नवे बॉस बनले आहेत.
सौरव गांगुलीने नव्या कार्यकारणीचे अभिनंदन केले आहे. सौरव गांगुली म्हणाला, ‘मी रॉजर बिन्नीचे मनापासून अभिनंदन करतो. निवडलेले नवीन सदस्य भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याचे काम करतील. बीसीसीआय चांगल्या हातात आहे. भारतीय क्रिकेट जोरदार प्रगती करत आहे, मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
जवळपास 3 वर्षे बीसीसीआयचे अध्यक्ष राहिल्यानंतर सौरव गांगुलीचा आज कार्यकाल संपला. याआधी त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र तसे झाले नाही. असे मानले जाते की सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये सहभागी होईल. तो CAB अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतो.
या पदाव्यतिरिक्त, सौरव गांगुली आयसीसीचे अध्यक्ष होण्याचीही शक्यता होती. परंतु बोर्डाने यावेळी निर्णय घेतला आहे की ते आपल्या वतीने कोणाचीही नियुक्ती करणार नाहीत. अशा परिस्थितीत बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीचे आयसीसी अध्यक्ष बनण्याचे मिशन अपूर्ण राहिले.
बीसीसीआय निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर जवळपास सर्वच पदांवर बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष बनले आहेत. तर राजीव शुक्ला यांना उपाध्यक्षपद मिळाले आहे. जय शहा पुन्हा एकदा बीसीसीआयच्या सचिवपदी, तर देवजित सैकिया सहसचिव, आशिष शेलार यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.
या एजीएममध्ये भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक 2023 साठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. BCCI सचिव जय शाह यांनी माहिती दिली आहे की भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार नसल्याने आशिया चषक 2023 दुसऱ्या ठिकाणी आयोजित करण्याचा विचार केला जाईल.
महत्वाच्या बातम्या
eknath shinde : शिंदे – फडणवीसांमध्ये वादाची ठिणगी! मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ सवयीवर भडकले फडणवीस; मतभेद चव्हाट्यावर
narayan rane : भाजपच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे; शिवसेनेने भाजपला पाडले उघडे
devendra fadnavis : शिंदे-फडणवीसांमधील वाद चव्हाट्यावर! ‘या’ कारणामुळे फडणवीस नाराज, वाचा नेमकं काय घडलं?