नादच खुळा! साठी पार केलेल्या आजोबांनी बांधले डोक्याला पुन्हा बाशिंग; सर्वत्र आजोबांची चर्चा

अहमदनगर। संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावातील एका साठ वर्षाच्या आजोबांनी 40 वर्षीय महिलेशी लग्नगाठ बांधल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. व त्यामुळे सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

खरंतर आताच्या काळात तरुणाचं एकदा लग्न होणं देखील कठीण झालं आहे. अशातच या आजोबांनी तर चक्क साठी पार करून दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. चिमाजी कुदनर आजोबांचं नाव आहे. चिमाजी यांच्या पहिल्या पत्नीचं वर्षाभरा पूर्वी निधन झालं.

चिमाजी यांना एक मुलगी आहे. मात्र चिमाजी यांच्या मुलीचं देखील लग्न झालं व त्यानंतर चिमाजी खूप एकटे पडले. आपण आतापर्यंत असे अनेक लोक पाहिले आहेत. ज्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यावर ते दुसरं लग्न करतात. कारण त्यांना घरी एखादी स्त्रीचा आधार असणे गरजेचे वाटते.

असंच काहीस चिमाजी यांच्या बाबतीत झालं. घरी कोणीच नसल्याने ते एकटे पडले होते. त्यात त्यांचं वय झालं आहे त्यामुळे त्यांची काळजी करणारं कोणीच नव्हतं. अशातच एकंदरीत चिमाजी यांचा विचार करून त्यांच्या मित्रांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला मग काय आजोबांनी लग्न करण्याचं ठरवलं.

काही दिवसातच साठ वर्षीय आजोबांच त्यांच्या नात्यातील सुमन नावाच्या एका मुलीसोबत त्यांचा विवाह पार पडला आयुष्याच्या संध्याकाळी कोणीतरी आपलं सोबत असावं या हेतूने आजोबांनी लग्न केलं. त्यांचा हा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला.

चिमाजी कुदनर यांचा विवाह आमच्या गावात पार पडला कुदनर यांच्या पत्नीचे एक वर्षापूर्वी निधन झाले. आणि मुलीचं लग्न झालं त्यामुळे घरी खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याने आम्ही ग्रामस्थांनी हा विषय घेतला आणि त्यांचं लग्न नात्यातील एका मुली सोबत लावून दिले असल्याचे त्यांच्या एका मित्राने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
तुम्ही जीएसटी भरूच नका, मग ठाकरेच काय नरेंद्र मोदीही तुमच्या दारावर येतील; मोदींच्या भावाचे व्यापाऱ्यांना आवाहन  
‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती घर सोडून गेल्यावर होणार मोठा धमाका
प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी करणार लग्न? ‘असा’ हवा आहे मुलगा
‘पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.