भारतनाना माफ करा! तुमच्या सेवेला पैशाने हरविले, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली

पंढरपूर । संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा निवडणूकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला, तर भाजपने विजय मिळवला. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली.

याबाबत त्यांनी ट्विट करून खेद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले.

राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भारतानाना भालके यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांचा या निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला. यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ही निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणुक होती. यामुळे सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले होते. अखेर भाजपने या निवडणूकीत बाजी मारली आहे.

महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, असे अनेक नेते प्रचारासाठी तळ ठोकून होते. तर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील असे बडे नेते प्रचार करत होते.

ताज्या बातम्या

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर सावधान! इंकम टॅक्स डिपार्टमेंट करेल जप्त, वाचा नियम

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंनी घेतली चांगली मत;पण पाहावे लागले पराभवाचे तोंड

IPL विजेता कर्णधार वाॅर्नरवर आली वाॅटरबाॅय बनण्याची वेळ; भर मैदानात ढसाढसा रडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.