किळसवाणे! ‘या’ प्रसिद्ध गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याच्या तोंडावर केली लघुशंका, नंतर म्हणाली..

अमेरिकन गायिका आणि गीतकार ‘सोफिया उरिस्ता’ तिच्या लाइव्ह कॉन्सर्टपासून प्रचंड चर्चेत आहे. किंबहुना, या लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान तिने असे कृत्य केले कि, ज्यानंतर तिला आणि तिच्या बँडला माफी मागावी लागली. वास्तविक सोफियाने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान तिच्या एका चाहत्याच्या चेहऱ्यावर लघुशंका केली होती.

सोफियाच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत असून तिने या मुद्द्यावर माफी मागितली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना तिने सांगितले की, ती स्टेजवर नेहमीच तिच्या मर्यादेत राहते. तिने असेही सांगितले की ती शॉक आर्टिस्ट नाही आणि ती अशा शॉकिंग कृत्यांमधून नव्हे तर तिच्या संगीताद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेणे पसंत करते.

लोकांना दुखवण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता, असे सोफियाने सांगितले. ११ नोव्हेंबरला सोफिया उरिस्ताचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता. तिने आपल्या एका पुरूष चाहत्याला स्टेजवर बोलावले आणि त्यानंतर तिने लघवी केली. सोफियाच्या या कृतीवर अनेक चाहत्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली. याला पब्लिसिटी स्टंट म्हणणारेही अनेक होते.

या घटनेनंतर सोफियाच्या ब्रास अगेन्स्ट या बँडनेही माफी मागितली आहे. आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत ब्रास अगेन्स्टने लिहिले की, सोफिया खूप उत्साहित झाली होती. हे असे काहीतरी होते कि ज्याची आम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती आणि आमच्या शोमध्ये तुम्हाला दिसणारही नाही.

विशेष म्हणजे, सोफियाशिवाय आणखी एक प्रसिद्ध गायक ‘ट्रॅव्हिस स्कॉट’चा लाइव्ह कॉन्सर्टही प्रचंड चर्चेत होता. ट्रॅव्हिसच्या कामगिरीदरम्यान, चेंगराचेंगरी झाली, ज्यानंतर त्याच्या अर्धा डझनहून अधिक चाहत्यांचा मृत्यू झाला. ट्रॅव्हिसने इंस्टाग्राम पोस्टवर याबद्दल दुःख व्यक्त केले, बरेच लोक त्याच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत.

२०१६ मध्ये सोफियाने अमेरिकेतील लोकप्रिय शो ‘द व्हॉईस’मध्ये भाग घेतला होता. तिने आपल्या अभिनयाने प्रसिद्ध गायिका ‘मायली सायरस’चे मन जिंकण्यात यश मिळवले होते. गायिका बनण्याच्या तिच्या निर्णयावर सोफियाचे कुटुंब खूश नव्हते पण शेवटी ती एक संगीत कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.