सोनू सुदच्या चाहत्याने सुरू केलं ‘सोनू सुद मटन शॉप’; सोनू सुद म्हणाला, “मी शाकाहारी आणि माझ्या नावाने मटन शॉप…”

तेलंगणा | लॉकडाउनमध्ये अनेक कलाकार प्रसिद्धी झोतात आले होते. अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळींनी लॉकडाउनमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने गरीब लोकांची मदत केली आहे. पण एका कलाकाराने मात्र त्याच्या कामांनी देशातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

हा कलाकार म्हणजे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद. सोनू सूदने त्याच्या कामाने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. गोरगरीबांची मदत करत असताना अभिनेता सोनू सुदला कोरोनाची लागण झाली होती.

मात्र कोरोनावर मात करत सोनू सुद पुन्हा मदतीसाठी बाहेर पडला आहे. कोरोना काळात अनेक रुग्णांना सोनूने ऑक्सिजन सिलेंडर पुरवले आहेत. सोनू सुदच्या कार्याचे संपुर्ण देशात कौतूक होत आहे. काही दिवसांपुर्वी सोनू सुदच्या चाहत्यांनी सोनू सुदच्या फोटोला दुधाने अभिषेक घातला होता.

आता तेलंगणामधील करिमनगर येथील  सोनू सुदच्या एका चाहत्याने सोनू सुदचं नाव मटनाच्या दुकानाला दिलं आहे. तेलंगणामधील न्यूज चॅनेलने व्हिडिओच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. सोनू सुदने हाच व्हिडिओ ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे.

सोनू सुद म्हणाला, मी शाकाहारी आहे आणि माझ्या नावाने मटन शॉप? मी याची शाकाहारी दुकान सुरू करण्यास मदत करू शकतो का? असं सोनू सुद म्हणाला आहे. सोशल मिडियावर सोनू सुदच्या ट्विटची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

सोनू सुदने लॉकडाऊनमध्ये लोकांच्या मनावर छाप पाडली होती. सोनू सुदने आजवर देशातील सर्वसामान्यांची तर मदत केलीच आहे. त्याचबरोबर कलाकारांची, खेळाडूंची सोनू सुदने मदत केली आहे. दरम्यान सोनू सुदवर अनेकांनी टीकाही केली आहे.

सोनू सूद ट्विटच्या माध्यमातून लोकांना आधी मदत करत होता. त्यामुळे सोनू सूदला टॅग करुन मदत मागण्याचे प्रमाण खुप वाढत चालले आहे. सोनू सूद जेवढ्या लोकांना शक्य होईल, तेवढ्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

अशात ट्विटरवर अनेक लोकांनी सोनूकडे विचित्र मागण्याही केल्या होत्या. एका गावातील तरूणाने गावात माकड आलं आहे सोनु सुद मदत करा. अशी मागणी केली होती. तसेच एका तरुणीने सोनू सूदकडे चक्क बॉयफ्रेंडची मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘भाभीजी घर पर है’मधल्या शिल्पाने अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम?; कंस्ट्रक्शन साईटवर करतेय काम
संसदेत जेव्हा मोदी सरकार १०२ वी घटनादुरूस्ती करत होते तेव्हा संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही?
‘रमता जोगी’वर तीन पोरींनी केलेला हा डोळ्याचं पारण फेडणारा डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.