“कुणीही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार नाही; सर्वांना मोबाईल पाठवतोय”

मुंबई | लॉकडाउनमध्ये अनेक कलाकार प्रसिद्धी झोकात आले होते. अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळींनी लॉकडाउनमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने गरीब लोकांची मदत केली आहे. पण एका कलाकाराने मात्र त्याच्या कामांनी देशातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

हा कलाकार म्हणजे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद. सोनू सूदने त्याच्या कामाने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. सोनू सूद नेहमी मदत करण्यास पुढे असतो. त्याच्याकडे या वेळेस आलेल्या मदतीच्या मागणीची चर्चा जोरदार सूरू आहे.

गोरगरीब कूटूंबातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी झटणाऱ्या संस्थेने सोनू सूदकडे मदत मागितली होती. रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सून सूद यांनी मोबाईल फोन द्यावा. त्यामूळे या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणी येणार नाहीत. अशी मदत एका संस्थेने ट्विटरच्या माध्यमातून सूद यांच्याकडे मागितली होती.

 

अभिनेता सोनू सूदने या मागणीला तात्काळ प्रतिसाद दिला आहे. ट्विट करून सोनूने म्हटले की, “कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आपल्या सर्वांना फोन पाठवतं आहे”. सोनू सूद पुन्हा एकदा गरिबांच्या मदतीला धावल्याने त्याचे कौतूक अनेकांनी केले आहे. सध्या सोशल मिडियावर सोनू सूदच्या या मदतीची चर्चा होत आहे.

सोनू सूदने हिंदी, तेलगू, कन्नड अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दबंग, सिंग इज किंग, शुट आऊट ऍट वडाळा, जोधा अकबर, रमैया वस्तावैया या चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. शुट आऊट ऍट वडाळा चित्रपटामध्ये सोनूने दाऊदची उत्कृष्ट भूमिका निभावली आहे.
महत्वाच्या बातम्या
..आणि मास्टर ब्लास्टर सचिनच्या त्या कृतीने डॉक्टरही दचकले, पहा व्हायरल व्हिडीओ
पिवळं सोनं! हळदीला विक्रमी भाव, प्रतिक्विंटल शेतकऱ्यांना ३० हजार रुपये
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी, विरोधकांनी हल्ला केल्याचा आरोप
दुर्देवी! आईची सरपंच पदी निवड झाली, अन् विजयी मिरवणूकीतच लेकाने सोडला प्राण

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.