सुरेश रैनाने ट्विट करत ऑक्सीजन मागीतला; सोनू सूद म्हणाला १० मिनीटांत पाठवतो भावा

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने देशामध्ये हाहाकार माजवला आहे.कोरोना काळात अभिनेते, उद्योजक, नेतेमंडळी आपआपल्या तऱ्हेने गोरगरीबांना मदत करत होते.  यांच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद धावला आणि त्याने लोकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली.

सोनू सूद आजही मदतीसाठी पुढे येत आहे. मदत मिळाल्यानंतर त्याच्या मदतीचं कौतूक सूरू असतं. सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोनावर मात करत सोनू सूद पुन्हा लोकांच्या मदतीला मैदानात आला आहे.

आता सोनू सूद भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा क्रिकेटर सुरेश रैनाच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सुरेश रैनाने ट्विट करत आपल्या मावशीसाठी ऑक्सिजनची मदत मागितली होती.

माझ्या मेरठमधील मावशीसाठी ऑक्सिजनची गरज आहे. त्यांचे वय ६५ वर्ष आहे आणि रुग्णालयात त्यांच्यावर फुप्फुसाच्या आजारावर उपचार सुरू आहेत. अशी मदत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली होती.

सोनू सूदने सुरेश रैनाच्या ट्विटला रिप्लाय देत भाई १० मिनिटांत ऑक्सिजन पाठवत असल्याचं सांगितलं. सोनू सूद आजवर सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावत होता. मात्र त्याने आता भारताचा खेळाडू सुरेश रैनाची मदत केल्याने स्वत: सुरेश रैनाने आभार मानले आहेत.

अभिनेता सोनू सूदने हिंदी, तमिळ, पंजाबी, तेलगू चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना घरी पाठवत त्यांची मोठी मदत केली होती आणि तेव्हा पासून सोनू सूद चर्चेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्स पाठविणार त्यांच्या खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईट्सने; बाकीच्या संघाना पण देऊ केली मदत
कॉमेडी क्विन भारती सिंहची झाली फजिती; पहा व्हिडिओ
आयपीएलच्या समाप्तीनंतर विराट कोहली युवा सेनेसोबत उतरणार कोरोना लढ्यात
अभिनेत्री मिताली मयेकरच्या आगळ्यावेगळ्या ‘मंगळसूत्रा’ची सर्वत्र चर्चा; पहा व्हायरल झालेले खास फोटो

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.