युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध पाहून जग सध्या हैराण झाले आहे. अनेक भारतीय विद्यार्थीही तिथे युद्धाच्या परिस्थितीत अडकले आहेत आणि प्रत्येकजण त्यांच्याबद्दल खूप चिंतेत आहे. अनेक मुलेही सुखरूप भारतात परतली असून आणखी अनेकांना आणण्याची तयारी सुरू आहे.
या युद्धाच्या परिस्थितीत सोनू सूद पुन्हा एकदा देवदूताच्या भूमिकेत दिसत आहे. युक्रेनमधून सुखरूप परतलेल्या एका विद्यार्थ्याने तिथली संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि सोनू सूदच्या टीमने त्याला कशी मदत केली हे सांगितले. जेव्हा युक्रेनमधून आपल्या देशातील लोकांना बाहेर काढण्यासाठी चौथे विमान दिल्ली विमानतळावर आले, तेव्हा जीव वाचवून परत आलेल्या एका विद्यार्थ्याने आपली संपूर्ण कहाणी सांगितली. या विद्यार्थ्याने सांगितले की त्याला सोनू सूदच्या टीमने योग्य मार्गदर्शन केले आणि मदत केली आहे.
सोनू सूदने स्वतः हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा खूप कठीण काळ आणि कदाचित हे माझे आतापर्यंतचे सर्वात कठीण काम आहे. सुदैवाने, आम्ही अनेक विद्यार्थ्यांना सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करू शकलो. चला प्रयत्न करत राहू, त्यांना आपली गरज आहे.
https://twitter.com/SonuSood/status/1498951065982705672?t=B1cZyiTdC3K08w_XWzfYxw&s=19
सोनू सूदने आपल्या पोस्टमध्ये भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय दूतावास यांचे चांगल्या मदत कार्याबद्दल अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या सतत सहकार्यासाठी त्याने त्यांचे आभार मानले आहेत. या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हा विद्यार्थी आपला अनुभव सांगताना दिसत आहे. तो म्हणत आहे की, आज १५ दिवसानंतर त्याला आराम मिळाला आहे.
हे युद्ध ८ वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे विद्यापीठ खुले राहील, असे मला सांगण्यात आले होते. तसेच तिथली परिस्थिती भयंकर होती, म्हणूनच मी घाबरून बाहेर आलो नाही. ज्याची जी सीमा आहे, त्यांनी तिथून निघून जा, असे आम्हाला सांगण्यात आले होते. माझ्याकडे पोलंडची सीमा होती, असे लक्ष्मणने म्हटले आहे.
तो पुढे म्हणाला, पोलंडच्या बॉर्डरला ३ बॉर्डर आहेत, मी बाहेर गेलो आणि रात्र झाली. बसने मला २० मिनिटांपूर्वी सोडले. खुप वेळानंतर आम्हाला थंडीत स्वतःसाठी शिबिर सापडले, आम्ही सकाळी लवकर निघालो आणि माझ्या मित्राने एक व्हिडिओ पाठवला की तेथे भांडण होत आहे आणि मुलांशी वाईट वागणूक दिली जात आहे. मग मी न जाता परत आलो. यानंतर मी सोनू सूदच्या टीमशी संपर्क साधला.
त्यांच्या टीमने मला मार्गदर्शन केले आणि कोणती सीमा सर्वात सुरक्षित आहे हे सांगितले. मी रात्री १२ वाजता बाहेर आलो आणि तिरंगा हातामध्ये घेतला. त्याचा परिणाम असा झाला की कोणीही ध्वज पाहून मला थांबवले नाही. आम्हाला सीमेवर जेवणही दिले. त्यानंतर मी तिथून सुखरूप बाहेर पडू शकलो.
महत्वाच्या बातम्या-
फेसबूकवर विदेशी महिलेशी मैत्री करणं भोवलं, लागला ८ लाखांना चुना; पोलिसांनी असा लावला छडा
उन्हाळ्यात पाण्यातूनच कमवा पाण्यासारखा पैसा; असा करा मिनरल वॉटरचा बिझनेस, कमवा करोडो
चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच झुंडच्या टीमचा जबरदस्त डान्स; नागराज मंजुळे यांनी स्वत: वाजवली हलगी