पैसे नसतानाही सुरु करा स्वत: चा नवीन व्यवसाय; तरुणांसाठी सोनू सूदची नवीन स्किम

मुंबई: अभिनेता सोनू सुदने कोरोना काळात लोकांची मदत करायला सुरुवात केली होती. त्याने हे काम अजूनही सुरु ठेवले आहे. कोरोनाच्या काळात सोनूने अनेक कामगारांना घरी जाण्यासाठी मदत केली होती. त्यासोबतच त्याने लॉकडाऊनमध्ये अनेक चांगली काम केली आहेत.

आत्ता वेळेनूसार सोनूने त्याची मदत करण्याची पद्धत देखील बदलली आहे. सोनू आत्ता फक्त लोकांना घरी जाण्यासाठी मदत करत नाही. तर अनेकांना त्याने नोकरी दिली आहे. अनेक लोकांच्या आजारावर उपचार केला आहे. त्यामूळे त्याचे चाहते खुप आनंदी आहेत.

या वेळेस सोनू सुदने बेरोजगार लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन स्किमच्या माध्यमातून सोनू गावातील बेरोजगार तरुणांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी संधी देणार आहे. त्याने त्याच्या सोशल मिडीया आकाऊंटवर या स्किमची माहीती दिली आहे.

 

सोनूने त्याच्या इंस्टाग्राम आकाऊंटवर या संबंधीचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये लिहीले आहे की, ‘जर तुमच्याकडे झिरो इन्वेस्टमेंट आहे. पण तरीही तुम्ही मालिक बनू शकता’. या मोहिमेद्वारे सोनू सुद गावातील तरुणांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

सोनूने ज्यावेळी या गोष्टीची माहीती लोकांना दिली. त्यावेळी लोकं खुप आनंदी झाले. त्यांनी सोनूच्या कामाचे कौतूक केले आहे. एका युजरने कमेंट केले की, ‘सर फक्त तुमच्यामूळे लोकांना चांगूलपणावर विश्वास आहे’. दुसऱ्या युजरने लिहीले की, ‘अडचणींच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात’. सगळीकडे सोनूच्या कामाचे कौतूक होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.