अभिनेता सोनू सूद यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. सोनू सूद अचानक पवारांना भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. यावर बोलताना माजी मंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
सोनू सूदचे निवासस्थान बेकायदा असल्याचे सांगत मुंबई महानगरपालिकेने त्याला नोटीस बजावली आहे. आता सोनू सूदने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘नेत्यांना भेटल्यानंतर आरोप मिस्टर इंडियासारखे गायब होतात’ अशी टिका केली आहे.
“याआधी देखील कोरोना काळात मदत करताना सोनू सुदवर शिवसेनेने आरोप केले होते. तेव्हा सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आरोप हे मिस्टर इंडियासारखे गायब झाले. ही एक नवी पद्धत आपल्या देशात विकसित होत आहे.” अशी टीका मुनगटीवार यांनी केली आहे.
“कायद्याचे राज्य आहे. पण कायदे फक्त कागदावर असून चालत नाही. या कायद्यांचा धाक राहिला पाहिजे. आज काल कायद्यापेक्षा नेते हे मोठे झाले आहेत. एखाद्या मोठ्या नेत्याची भेट घेतल्यानंतर कायद्याविरोधात काम केलं तरी नेत्याचं कवचकुंड असल्याने कायदा तुम्हारा कूच नही बिघाड सकता ही भावना निर्माण होत आहे.” असे ते म्हणाले.
तर “सोनू सूदने पवार साहेबांना आपली बाजू मांडणापेक्षा कोर्टात आपली बाजू मांडायला पाहिजे,” असाही टोला मुनगंटीवार यांनी सोनुला लगावला आहे. सोनू आणि शरद पवार यांच्यात यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. पण सध्या महापालिकेकडून गंभीर आरोप होत असल्याने सोनू सूदने याविषयी चर्चा केल्याची शक्यता आहे.
बला.त्काराच्या आरोपाने धनंजय मुंडे अडचणीत; घेतली थेट शरद पवारांची भेट
“अत्याचार झाले तेव्हाच गुन्हा दाखल करायचा होता, संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो”
भाजपाचा हल्लाबोल; ‘गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण…’