आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदला नेटकऱ्यांनी धुतले, #Scamsood ट्रेंडींग

आयकर विभागाने सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयासह संबंधित 6 ठिकाणी छापेमारी केली होती. या ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर विभागाने सोनूवर 20 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप केला आहे. १५ कर्मचाऱ्यांना कागदोपत्री संचालक बनवल्याचा आरोपही सोनू सूदवर आहे.

यानंतर सोशल मीडियावर नेटक-यांनी सोनू सूद वरून मीम्स तयार केले एवढंच नाही तर #scamsood अश्या हॅशटॅगने व्हायरल केले आहेत. यामध्ये काही जण सोनू सुदच्या समर्थनात आहेत तर काहीजण त्याच्या विरोधात आहेत.

हा हॅशटॅग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सर्व मीम्स #scamsood याने व्हायरल होत आहेत. कोरोनाकाळातही सोनू सूदने लोकांना मदत केली होती. त्यावेळीही त्याचे “सुपरमॅन”, “सुपरहिरो” अशा प्रकारचे अनेक मीम्स व्हायरल झाले होते.

आयकर विभागाच्या छापेमारी प्रकरणी सोनू सूदने कालच सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया टाकून त्याचे मौन सोडले. त्याने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “प्रत्येकवेळी तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची गरज नसते. कारण काळ सर्व सांगतो. यावेळी त्याने त्याच्या फाऊंडेशनचे पैसे आहेत ते गरजूंना दिले हे देखील सांगितले.

15 सप्टेंबर रोजी आयकर विभागाने सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयासह 6 ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी आयकर विभागाने असा दावा केला होता की सोनू सूदशी संबंधित असलेल्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर, 20 कोटी रुपयांची करचोरी , 65 कोटी रुपयांचे फसवे व्यवहार, दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त अवैध विदेशी निधी आणि जयपूरमधील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत 175 कोटींचा घोटाळाही केला आहे.

कोरोनाच्या काळात, सोनू सूदने अनेक गरजू लोकांना मदत केली होती. शहरातून त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्यास त्याच्या खर्चाने विमानसेवा तसेच बस सेवा उपलब्ध करून दिली होती.

 

महत्वाच्या बातम्या
मुस्लिम कृष्णभक्तानं गायलं महाभारताचं टायटल सॉंग; गळ्यातून काढला शंखाचा आवाज, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतूक कराल
“हसन मुश्रीफ म्हणजे कोल्हापूरचे पैलवान आहेत, ते कोणालाच ऐकणार नाहीत”
क्रूरतेचा कळस! दारूच्या नशेत आईचं पोटच्या मुलीसोबत अमानुष कृत्य; गाडीला बांधलं अन् फरफटत नेलं…
‘सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन कटणाऱ्याप्रमाणे’, सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.