सोनू सूदच्या ६ मालमत्तांवर इन्कम टॅक्सची धाड; लोकांच्या मदतीला सोनूकडे पैसे आले कुठून?, आयटीचा प्रश्न

देशभरात कोरोनाचा प्रसार होत असताना त्यापासून वाचण्यासाठी देशभरात अचानक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लाखो स्थलांतरीत नागरीक राज्यात अडकले होते. त्यांना बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने त्यांच्या त्यांच्या घरी पोहचवले होते.

त्यावेळी कोरोनाच्या भीती पोटी आणि आपल्या घराच्या आसेपोटी लाखोंच्या संख्येने कामगार पायपीट करत निघाले होते. वाटेत त्यांना मदत करणारे हात होतेच पण त्यांच्या पायाचे काय? हजारों किलोमीटरची पायपीट त्यांना करावी लागत होती. त्यांची व्यथा जाणून घेत सोनू सूद माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी पुढे सरसावला होता.
.
आता त्याच सोनू सूदच्या घरी आणि ऑफिसवर इन्कम टॅक्सचा छापा पडला आहे. एवढ्या लाखों लोकांना स्वखर्चाने मदत करण्यासाठीचा पैसा आला कुठून ह्याचे कोडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पडले होते, त्यामुळेच हा छापा टाकण्यात आला आहे.

आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. आयटी टीम सध्या सोनूच्या मुंबई कार्यालयात हजर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकाउंट बुकमध्ये विसंगती असल्याचा आरोप झाल्यानंतर आयटी टीमने सोनू सूद आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित ६ ठिकाणी छापे टाकले आहे.

२७ ऑगस्ट रोजी दिल्ली सरकारने सोनू सूदला शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. या दरम्यान त्यांच्या आम आदमी पक्षात सामील होण्याबाबतही अटकळ होती, पण सोनूने स्वतः सांगितले की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतर हा छापा पडल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, हजारों लाखों करोडो रुपये घेऊन पाळलेल्या हरामखोरांना पकडून त्यांची चौकशी कधी केली? एक माणूस माणुसकीच्या नात्याने मदत करतो आणि हे सरकार त्याच्या घरावर धाड टाकत आहे. अशा प्रतिक्रिया लोकांकडून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपमध्येही अमृता फडणवीस कलाकार आहेत, यांच्याबाबत दरेकर असेच बोलणार का?
घर घेण्याची सुवर्णसंधी! मुंबईत १५ लाखांमध्ये मिळतोय ५५७ स्क्वेअर फुटांचा फ्लॅट; जाणून घ्या प्रक्रिया
“पांढरे केस का लपवत नाहीस?”; वडिलांच्या प्रश्नावर समीरा रेड्डीने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.