चिमूरडी म्हणतेय मी आयुष्यभर सोनू सूदचा फोटो डिपीला ठेवनार आहे; कारण वाचून धक्का बसेल

सोनू सुदला आजचे लोक देवमाणूस म्हणतात कारण त्याने कामच तसे केले आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने लोकांना जी मदत केली आहे ती कोणत्याच बॉलिवूडच्या कलाकाराने केली नाही. रोज त्याला हजारो मेसेज येत असतात आणि सोनूही त्याला जमेल त्या लोकांना मदत करत असतो.

सोनू सूदमुळे अनेक लोकांना आज रोजगार मिळाला आहे, घर मिळाले आहे. अनेक लोक त्याच्यामुळे आज स्वताच्या पायावर उभे आहेत. त्याने केलेल्या कामाची दखल घेऊन फोर्ब्सकडून त्याला लिडरशिप अवॉर्ड २०२१ देखील मिळाला आहे.

सोनूने सोमवारी एक फोटो शेअर केला आणि लिहीले की आजच्या दिवसातील सगळ्यात सुंदर फोटो. हा फोटो एका मुलीचा होता जिला सोनूनेच मदत केली होती. तर झाले असे होते की एकाने सोनूला त्याच्या बहिणीच्या अभ्यासासाठी फोन मागितला होता. त्यानंतर सोनूनेही लगेच त्या मुलीला फोन पाठवून दिला.

त्यानंतर त्या बहिणीच्या भावाने सोनू सूदचे आभार मानले आणि लिहीले की मी माझ्या बहिणीच्या अभ्सासासाठी सोनूकडे फोन मागितला होता. त्यानंतर तिला फोन मिळाला. मी सोनूचे मनापासून आभार मानतो.

माझ्या बहिणीचे म्हणणे आहे की, सोनूचा फोटो तिच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर नेहमी राहील. कारण ते माझ्यासाठी देवासमान आहेत. जो माणूस संकटात आपल्यासोबत उभा आहे तो सगळ्यात मोठा आहे. सोबत त्याने आपल्या बहिणीचा फोटोही शेअर केला होता. हाच फोटो सोनूने ट्वीटरवर शेअर केला आणि लिहीले की आजच्या दिवसातील सगळ्यात सुंदर फोटो.

त्यानंतर अनेकांनी सोनुच्या या कामाचे कौतुक केले आहे. बॉलिवूडमध्ये खलनायकाचे काम करणारा सोनू आता खऱ्या आयुष्यात बऱ्याच लोकांसाठी हिरो बनला आहे. त्याने आतापर्यंत अनेक लोकांना मदत केली आहे.

महत्वाच्या बातम्या
कालच्या बैठकीत उद्धव ठाकरेंशी राज ठाकरे काय बोलले? स्वत: राज ठाकरेंनीच केलं जाहीर
मृत्यूपूर्वी दिव्या भारतीने केल्या होत्या ‘ह्या’ गोष्टी; जाणून आश्चर्य वाटेल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक; लॉकडाऊनवर महत्त्वाची चर्चा
अमित शहांना नक्षलवाद्यांचे पत्रकातून थेट आव्हान; ‘कोणा-कोणाचा सूड घेणार?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.