सोनू सूदने टेकले आरोग्य व्यवस्थेपुढे गुडघे;रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी त्यालाही बघावी लागली वाट

कोरोना काळात सोनू सुदने गोर गरीब जनतेसाठी मोठे कार्य उभारले.सोनू सूद गोर गरीब जनतेचा हिरो झाला होता.तो आता परत एकदा गरजू जनतेची मदत करताना दिसून येत आहे.तो आता जवळपास देशभरातील देशभरातील जनतेची मदत करताना दिसून येत आहे.

सोनू सुदने रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात याची आपभीती एका ट्विटद्वारे सांगितली आहे.त्याला दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी किती वेळ वाट पाहावी लागली हेच त्याने या ट्विटमधून सांगितले आहे.

सोनू सूद त्याच्या ट्विटमधून म्हणतो की”दिल्लीत बेडची व्यवस्था करण्यासाठी मला ११ तास लागलेत आणि उत्तर प्रदेशात एक बेङ मिळवून देण्यासाठी मला मला साडेनऊ तास लागलेत. पण तरीही आम्ही करून दाखवू” असे ट्विट सोनू सुदने केले आहे.

सोनू सूदला जर बेड शोधायला एवढा वेळ लागत असेल तर सर्वसामान्य जनतेचे हाल विचारू नका. तो त्याच्या ट्विटमध्ये पुढे म्हणतो की,”दिल्लीमध्ये देवाला शोधणे सोपे आहे,पण बेड मिळणे कठीण. पण शोधूच,तुम्ही हिंमत सोडू नका.”

सोनू सूदने यावेळी चीनकडे पण मदतीसाठी ट्विट केले होते.त्याने चीनचे भारतातील राजदूत यांना ट्विट करून त्यात टॅग केले आहे.तो त्या ट्विटमध्ये म्हणतो की,”आम्ही शेकडो ऑक्सिजन कन्सेंट्रेटर मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण चीनने आमच्या कंसाईन्मेंट्स रोखून धरल्या आहेत हे खूप दुःखद आहे.

या कंन्साईन्मेंट्स लवकर क्लिअर करा.लोकांचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला मदत करा”असे ट्विट सोनुने भारतातील चिनी दूतावासाला टॅग करून केले आहे. सोनूच्या या ट्विटला चिनी राजदूतांकडून पण तात्काळ रिप्लाय आला आहे.त्यांनी म्हटले आहे की,”कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात चीन भारताची पूर्ण मदत करण्यास तयार आहे.सर्व मालवाहतूक मार्ग सुरळीत आहेत.”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.