लोकांच्या समस्या सोडवणारा सोनू सूदचा दुधवालाच आहे सध्या टेन्शनमध्ये; पहा काय म्हणतोय…

कोरोनाच्या संकटात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद दिवसरात्र लोकांच्या मदतीला धावून येताना दिसून येत आहे. सोनूने आतापर्यंत हजारो लोकांची मदत केली आहे. सोनूच्या या कामात त्याचे कुटुंब आणि मित्रही त्याला साथ देत आहे.

सोनू सूदच्या कामामुळे लोकं त्याचे कौतूक करताना थांबत नाही. असे असतानाच सोनू सूदचा दूधवाला मात्र सोनू सूदवर नाराज आहे. त्यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोनूच्या दुधवाल्याचे नाव गुड्डु असे आहे.

दुधवाला गुड्डु सोनू सूदकडे आपले प्रश्न घेऊन गेला होता. त्याच्या या प्रश्नावर सोनू सूदने चक्क एक व्हिडिओच तयार केला आहे. तसेच हा व्हिडिओ सोनू सूदने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोनूने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोनू सूदमुळे मी खुप हैराण झालो आहे. कारण लोकं मला कधीपण फोन करता आणि आम्हाला सोनू सरांशी बोलायचंय असे म्हणतात. मी या गोष्टीने खुप त्रासलो आहे, असे दुधवाला म्हणताना दिसत आहे.

त्यावर सोनू सूद म्हणतो की, जो क्रमांक नागरीकांच्या मदतीसाठी आहे, त्या क्रमांकावर लोकांना फोन करायला सांग. तर यावर गुड्डु म्हणतो, लोकं अगदी चुकीच्यावेळी मला फोन करत आहे.

सोनू सूद ट्विटच्या माध्यमातून लोकांना आधी मदत करत होता. त्यामुळे सोनू सूदला टॅग करुन मदत मागण्याचे प्रमाण खुप वाढत चालले आहे. सोनू सूद जेवढ्या लोकांनी शक्य होईल, तेवढ्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

अशात ट्विटरवर अनेक लोकांनी सोनूकडे विचित्र मागण्याही केल्या होत्या. त्यामध्ये एका तरुणीने सोनू सूदकडे चक्क बॉयफ्रेंडची मागणी केली होती. विशेष म्हणजे काही वेळातच या मुलीची मागणी पुर्णही झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

स्थानिक स्वराज्य संघटनेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द; ठाकरे सरकारला मोठा झटका
कोरोनाच्या संकटात देश कोण चांगलं सांभाळू शकतं नरेंद्र मोदी कि राहूल गांधी ? जनता म्हणाली…
चार वर्ष वेगळे राहिल्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची झाली होती ‘अशी’ अवस्था

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.