विषय गंभीर तिथं सोनू सूद खंबीर! आता कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवून वाचवले त्यांचे प्राण

मुंबई । कोरोना काळात अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. गेल्या वर्षभरापासून मदत करणारांमध्ये एक नाव सातत्याने पुढे आहे, ते म्हणजे अभिनेता सोनू सूद. कोरोना काळात सोनू सूदने देवदूत बनून लोकांना प्रचंड मदत केली आहे. अनेकांना त्याने त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली होती.

आताही त्याने मदतीचे काम सुरूच ठेवले आहे. आता त्याने इंदौरमधील काही रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची मोठी गरज होती. त्याने लगेच १० ऑक्सिजन सिलेंडर पुरवले आहेत. तसेच काहींंना इंजेक्शन देखील पुरवले आहेत.

यामुळे या रुग्णांसाठी तो देवदूत बनून पुढे आला आहे. रुग्णांच्या घरच्यांनी देखील सोनू सुदचे आभार मानले आहेत. एकाने म्हटले आहे की, माझ्या आईसाठी चार रेमडेसीविर इंजेक्शन सोनू सूदने पाठवली. तिला मलेरिया, न्यूमोनिया आणि कोरोना एकत्र झाले आहे. या इंजेक्शमुळे माझ्या आईचा जीव वाचला आहे.

तसेच एकाने म्हटले आहे की, तुम्ही देवापेक्षा कमी नाही आहात. तुम्ही कोरोना काळात लोकांना जी मदत केली त्यासाठी तुमचे जितके आभार मानाल, तितके कमी आहेत. गेल्या वर्षभरात त्याने अनेकांना मोठी मदत केली आहे.

अनेकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, कोणाला आपल्या गावी जाण्यासाठी, अभ्यासासाठी देखील अशा प्रकारे मोठी मदत सोनू सुदने केली आहे. यामुळे ते लोक त्याचे आभार मानायला देखील विसरत नाहीत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.