सोनू सूदच्या कंपनीचे थेट काँग्रेसच्या मंत्र्याशी कनेक्शन, आयकर विभागाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

मुंबई । आयकर विभागाने अभिनेता सोनू सुदशी निगडीत असलेल्या ६ ठिकाणी छापेमारी केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. सोनू सुद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तब्बल २० कोटींचा कर चुकवला असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. असे असताना आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्राप्तिकर विभागाने सोनू सूदशी संबंधित २८ ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये राजस्थानचे सहकार मंत्री उदयलाल अंजाना यांच्या कंपनीचे कनेक्शनही दिसून आले आहे. उदयलाल अंजाना यांच्याशी संबंधित इंफ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सोनू सूदशी संबंधित कंपनीमध्ये १७५ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे दिसून आले. याबाबत कागदपत्रे हाती लागली आहेत.

सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनने देशाबाहेरील देणगीदारांकडून २.१ कोटी गोळा केले आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे आता चौकशी करण्यात येत आहे. यामुळे सोनू सूदच्या अडचणीत वाद होण्याची शक्यता आहे, याबाबत आयकर विभागाने माहिती दिली आहे.

कोरोना काळात सोनू सूदने अनेकांची मदत केली होती. लॉकडाऊनमध्ये अनेकांसाठी तो देवदूत ठरला होता. एफसीआरएच्या १ कोटीपेक्षा जास्त उल्लंघनाची चौकशी सीबीआयकडून केली जाते. यामुळे त्याला देखील चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

याबाबत सोनू सुद आणि त्याच्या निगडीत जागांवर छापेमारी केल्यानंतर करचोरीचे पुरावे हाती लागले आहेत. मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, गुरुग्राम आणि दिल्लीसह एकूण २८ ठिकाणी सलग तीन दिवस सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये अनेक माहिती समोर आली आहे.

असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी रक्कम जमा करण्यात आली आहे. अभिनेत्याने बनावट संस्थांकडून बनावट आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरुपात बेहिशोबी रक्कम जमा केली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे. यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.