सोनू सूदच्या मदतीवर कलेक्टरने व्यक्त केला संशय; सोनूने थेट पुरावेच फेकले तोंडावर

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या या कठीण काळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी सतत काम करत आहे. यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशात आता काही लोक त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. त्याच्या कामाबद्दल काही गोंधळात टाकणारी माहिती समोर आली आहे.

नुकतेच एका कलेक्टरने सोनू सूदच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. यानंतर अभिनेता सोनू सूदने यावर त्यांना समाधानकारक उत्तर दिले आहे. त्याच झाल की असं की, १५ मे रोजी एका व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून मदत मागितली होती.

त्या व्यक्तीला ओडीशामधल्या बेरहमपूर शहरातल्या गंजम सिटी हॉस्पिटलमध्ये बेड हवा होता. त्या व्यक्तीच्या ट्विटला उत्तर देताना सोनू म्हणाला, काळजी करू नकोस. गंजम सिटी हॉस्पिटमध्ये बेडची व्यवस्था केली आहे.

यावर १७ मे रोजी गंजम जिल्ह्याच्या कलेक्टरने सोनूच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत सांगितले की आम्हाला सोनू सूद किंवा सूद फाऊंडेशनकडून कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही. सोनूने ट्विटमध्ये ज्या रुग्णाचा उल्लेख केला आहे तो रुग्ण गृहविलिगीकरणात आहे. आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. बेडची कोणतीही समस्या नाही. बेरहमपूर महानगरपालिका लक्ष ठेवून आहे.

यानंतर जेव्हा सोनू सूद याला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी केलेल्या व्हाट्सएप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला. यासह सोनू सूदने लिहिले, ‘सर आम्ही तुमच्याकडे आलो असा आमच्याकडून कधीच दावा केला गेला नाही. गरजू व्यक्ती आमच्या जवळ येते आणि आम्ही त्याच्यासाठी बेडची व्यवस्था करतो.

तुमच्यासाठी मी हे चॅटचे स्क्रिनशॉट देतो. आम्ही त्या व्यक्तीस मदत केली आहे. आपण पुन्हा तपासू शकता. त्याचा संपर्क तपशील आपल्याला पाठविला आहे. तुमचे कार्यालय चांगले काम करत आहे. जय हिंद.

महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्री नोरा फतेहीने पॅलेस्टाईनवरच्या अन्यायाविरोधात उठवला आवाज; चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
रश्मिका मंदानाने मारली पलटी, आधी म्हणाली विराट माझा फेवरेट, पण आता घेतलं दुसऱ्याचं नाव
‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या मुंबईतील आलिशान घराचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.