सामान्यांचा देवदूत सोनू सूद बनला ऑलिम्पिक मूवमेंटचा ब्रँड एम्बेसेडर; म्हणाला संधीच सोन करणार

कोरोनाच्या महामारीत गरीब आणि गरजू लोकांसाठी धावून आलेला देवदूत म्हणजे सोनू सूद होय. त्यांनी अनेक लोकांना निस्वार्थपणे मदत केली, किंबहुना आजही ते अनेकांना मदत करताना पाहायला मिळतात. आजही अनेक लोक त्यांच्याकडे आशेने पाहतात.

अभिनेता सोनू सूदला कदाचित त्याच्या चित्रपटांमुळे इतकी लोकप्रियता मिळाली नसेल, पण कोरोनाच्या काळात त्यांनी अनेक चांगली कामे केली. तसेच त्यांनी  लोकांना ऑक्सिजनपासून ते त्यांच्या घरी सुरक्षितपणे नेण्याची जबाबदारी स्वीकारली, जगभरातील लोक त्याची स्तुती करत आहेत. सोशल मीडियावरही सोनू सूदचे वर्चस्व आहे.

अलीकडेच, जेव्हा सोनू सूदने त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा केला. तेव्हा लोक त्याला भेटण्यासाठी दूरदूरवरून आले. अभिनेत्यानेही त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही आणि त्यांना भेटले. चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाव्यतिरिक्त, सोनू सूदला त्याच्या वाढदिवशी आणखी एक खास आणि अविस्मरणीय भेट मिळाली.

सोनू सूदला त्याच्या ४८व्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी एक विशेष भेट मिळाली. ती म्हणजे विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड ब्रांड एम्बेसेडर म्हणून अभिनेत्याचे नाव देण्यात आले आहे. सोनू सूद पुढील वर्षीच्या विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड हिवाळी खेळांसाठी भारताच्या तुकडीचा भाग असेल. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार खुद्द सोनू सूदने ही माहिती दिली आहे.

सोनू सूदने भारताचे विशेष खेळाडू आणि अधिकाऱ्यांशी याबाबत संवाददेखील साधला आहे. सोनू सूद यांनी सांगितले की, ‘माझा आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. मी आज स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासोबत या प्रवासात सामील झालो आहे, याचा मला खूप आनंद आहे. या टीममध्ये समाविष्ट झाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी हे व्यासपीठ आणखी मोठे बनवण्याचे व देशभरातील लोकांसह त्याचे प्रतिनिधित्व करण्याचे वचन देतो.’

खेळाडूंशी संवाद साधताना सोनू सूदने त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला अतिशय सुंदर उत्तरे दिली. ऑलिम्पिक आशिया पॅसिफिक उपक्रम असलेल्या वॉक फॉर इनक्लूजनसाठी खेळाडूंनी त्यांची ओळख करून दिली.  आनंद व्यक्त करताना सोनू सूद म्हणाले की, ‘विशेष विश्व ऑलिम्पिक खेळांसाठी रशियात आमच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला सन्मान वाटतो. मी आमच्या खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करीन.

विशेष ऑलिम्पिक चळवळीचा ब्रँड एम्बेसेडर म्हणून आनंद व्यक्त करताना सोनू सूदने आपल्या सोशल मीडियावर लिहिले, ‘रशियामध्ये होणाऱ्या विशेष ऑलिम्पिक चळवळीचा ब्रँड एम्बेसेडर म्हणून माझी निवड झाल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. पूजा बत्रापासून फरहा खानपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर सोनू सूदचे अभिनंदन करत आहे.

हे ही वाचा-

मुली काही करु शकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लव्हलिनचे सडेतोड उत्तर; टोकियोत भारताला मिळवून दिले पदक

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही

वेदनादायी! 16 कोटींच्या इंजेक्शनंतरही 11 महीन्यांच्या वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.