सोनूने सगळ्यांचा भरोसा तोडत लावला चूना, १३ जणांशी लग्न करून चिक्कार लुटलं

जळगाव | खान्देशात सोनू शिंदे नावाच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. सोनूने तब्बल १३ मुलांना फसवले आहे, तिने तेराही जाणांशी लग्न केले. त्यानंतर त्यांना लुटलं आणि पळून गेली. विशेष बाब म्हणजे ती एकटी नाही तर तिच्यापाठीमागे एक मोठी टोळी असल्याचे समोर आले आहे.

शहादा तालूक्यातील मंदाणे येथील भूषण संतोष सैंदाणे यांचे ६ मे रोजी हिंगोली येथील सोनू राजू शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर नवी नवरी फक्त आठ दिवस राहिली आणि नंतर घरातून न सांगता पळून गेली. यानंतर दुसऱ्या दिवशी १६ मे रोजी भूषण यांनी शहादा पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद दिली.

या घटनेचा तपास करत असताना तरुणी २१ मे रोजी दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अगदी वेळेवर जाऊन सोनू शिंदे आणि टोळीला जेरबंद केलं. पोलिसांच्या या कारवाईचा सुगावा लागताच नवरीची आई आणि भाऊ पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांच्या कारवाईला थोडा जरी उशीर झाला असता तर आणखी एक कुटुंब सोनू शिंदे टोळीच्या जाळ्यात अडकले असते.

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी अटक केली ते या सोनू शिंदे या तरुणीचे १३ वं लग्न होत. तिने यापुर्वी इतर अनेक लोकांची फसवूक केली असल्याचे समोर आले आहे. लग्न केल्यानंतर दहा ते पंधरा दिवस नवऱ्याच्या घरी नांदल्यानंतर सोनू त्यांची फसवणूक करून पळून जायची. लग्नापुर्वी आणि लग्नात ही टोळी नवऱ्या मुलाकडून चिक्कार पैसै लुटत होती.

समाजात मुली मिळत नाहीत. मुलीला सरकारी नोकरी करत असलेला मुलगा हवा असतो. छोटेमोठे व्यवसाय आणि शेती करणाऱ्या मुलांना विवाह योग्य मुली मिळत नाहीत. अशात पैसे घेऊन सोनू सारख्या टोळ्या लोकांना मोहात अडकवून त्यांची फसवणूक करत आहेत. पालकांनी अशा टोळीपासून सावध राहावे.

महत्वाच्या बातम्या-
दिल्लीचे नाव जोपर्यंत इंद्रप्रस्थ ठेवले जात नाही तोपर्यंत देश संकटात असेल: सुब्रमण्यम स्वामी
अभिनव आणि श्वेताच्या भांडणावर तिच्या पहिल्या पतीने दिली प्रतिक्रिया; म्हटला असे काही की
ऑक्सिजन सिलेंडर न मिळाल्याने शेतात झाडाखाली जाऊन बसला; अन् ३ दिवसातच कोरोनाला हारवून आला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.