Homeताज्या बातम्यासोनू निगम कुटुंबासह कोरोनाच्या विळख्यात; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, 'आम्ही हॅप्पी कोरोना...

सोनू निगम कुटुंबासह कोरोनाच्या विळख्यात; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘आम्ही हॅप्पी कोरोना पॉझिटिव्ह फॅमिली’

कोरोना विषाणू पुन्हा एकदा लोकांना झपाट्याने आपल्या विळख्यात घेत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोना बाधितांची दररोज नवीन आकडेवारी समोर येत आहे. यादरम्यान सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण होत आहे. तर आता बॉलिवूड गायक सोनू निगमलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत सोनूने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.

सोनूने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो सांगत आहे की, ‘तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, मी कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. काही लोकांना याची माहिती आहे तर काहींना याबाबत माहिती नाही. मात्र, हे खरे आहे की, मी कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. मी सध्या दुबईत आहे. मला भारतात यायचे होते कारण भुवनेश्वरमध्ये मला एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. तसेच सुपर सिंगर सीझन ३ चे चित्रीकरणही करायचे होते’.

सोनूने पुढे सांगितले की, ‘जेव्हा मी माझी कोरोना चाचणी करून घेतली तेव्हा माझी चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र, मी हळू हळू ठीक होणार आहे. मी अनेकवेळा माझा घसा खराब असतानाही अनेक कॉन्सर्ट केले आहेत. त्यापुढे हे काहीच नाही. मी कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. पण मी मरत नाहिये. मला गाताही येत आहे म्हणजे मी ठीक आहे. पण मला या गोष्टीचे वाईट वाटत आहे की, खूप नुकसान झाले आहे. माझ्यामुळे इतरांना त्रास होत असून माझ्या जागी इतर गायकांना जावे लागत आहे’.

‘आमच्या आजूबाजूला अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. हा विषाणू वेगाने परसत आहे. आम्हा सर्वांसाठी मला वाईट वाटत आहे की, काम पुन्हा बंद होत आहे. कारण काम आताच सुरु झाले होते. सिनेमागृह आणि चित्रपट निर्मात्यांसाठीही मला वाईट वाटत आहे. कारण दोन वर्षापासून त्यांना नुकसान सोसावे लागत आहे. पण सर्व काही ठीक होईल अशी अपेक्षाही आहे’.

व्हिडिओत शेवटी सोनूने त्याची पत्नी मधुरिमा आणि मुलगा निवानलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सोनूने म्हटले की, ‘माझा मुलगा, माझी पत्नी आणि पत्नीची बहिणसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे. आम्हा सर्वांना कोरोनाची लागण झाली असून आम्ही हॅप्पी कोरोना पॉझिटिव्ह फॅमिली आहोत’.

महत्त्वाच्या बातम्या : 

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; नवीन नियमावली जाहीर
‘या’ दिवशी मुंबईत लाॅकडाऊन होणार; महापालिका आयुक्त चहल यांनी सांगीतला ‘तो’ दिवस
मुस्लिम महिलांचे फोटो अश्लील साईट्सवर अपलोड झाल्यामुळे जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले हे धार्मिक राक्षस…