‘ही तर बेसुऱ्यांची फौजच!’ सोनू कक्कडनं नुसरत फतेह अलींचं गाणं गायल्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

‘इंडिअन आयडल १२’ शोमुळे अनेक चर्चांना उधान आलेलं पाहायला मिळत. आयेदिन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा शो सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. या शोची टीआरपी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्यामुळे त्यांच्यावर लोकांनी कडाडून टीका केली होती.

हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचे खरे कारण म्हणजे शोचे परीक्षक आहेत. लोकांनी सर्वात जास्त प्रश्न कार्यक्रमातील परीक्षकांवरून उठले आहेत. सध्या अनु मलिक आणि मनोज मुंतशीर परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. पण नेमकी याच गोष्टीमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण कार्यक्रमामध्ये कधी मनोज दिसतात तर कधी अनु मलिक असतात.

तसेच कार्यक्रमाच्या नवीन प्रोमोमध्ये सोनू कक्कड देखील परीक्षक म्हणून दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी कार्यक्रमाला सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. जिथे परीक्षक एक नाही तिथे स्पर्धकांना की जज करणार असेही प्रश्न निर्माण झाले आहे.

इतक्यातच इंडिअन आयडल १२ चा एक प्रोमो प्रसारित झाला आहे. त्यामध्ये सवाई भटने गाणे गायले आहे. ते गाणे ऐकून त्याला सोशल मीडियावर युझर्सने ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काहींनी तर असेही म्हटले आहे की, बघा ही तर बेसुऱ्या लोकांची फौजच झाली आहे. या आठवड्यात होणाऱ्या कार्यक्रमात स्पर्धक प्रेक्षकांनी शिफारस केलेली गाणी गाणार आहेत.

प्रोमोमध्ये सवाई भट्ट ‘तेरी दिवानी’ हे गाणे गाताना दिसत आहे. त्यानंतर सवाईने सोनू कक्कड बरोबर गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सोनूने आणि सवाईने नुसरत फतेह अली खान यांचे ‘मेरे रश्के कमर’ हे गाणे गायले. त्यावरून या दोघांनाही सोशल मीडियावर युझर्सने ट्रोल करायला सुरुवात केली.

इंडियन आइडल 12: सोनू कक्कड़ ने गाया नुसरत फतेह अली खान का ये गाना, यूजर्स  बोले- बेसुरों की फौज आ गई - Entertainment News: Amar Ujala

लोकांनी सोनू कक्कडला आणि निर्मात्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. काहींनी कमेंट केली की, जगातील सर्वात बकवास कार्यक्रम आहे. संपूर्ण कार्यक्रमातच गडबड असून सगळ्यांचं एकमेकांशी साटंलोटं आहे. तसेच युझर्सने लिहिले आहे की सोनू कक्कडने गायलेले ‘मेरे रश्के कमर’ गाण्याने मुळ गाण्याची वाट लावली आहे.

अंजली गायकवाडला नॉमिनेट केलेल्या भागानंतर अनेकांनी आक्षेप घेतला. अंजली ऐवजी शनमुखा प्रियाला का काढले नाही असेही अनेकांनी प्रश्न उठवले. कॉंग्रेसचे नेते अजय माकन यांनीदेखील अंजली गायकवाडच्या नॉमिनेशवर आक्षेप घेतला. तर काही चाहत्यांनी कोणाचेही एलिमिनेश करू नका असेही म्हटले.

हे ही वाचा-

कार्याला सलाम! महाराष्ट्र पोलीस रेहाना बनल्या कोरोना संकटात सापडलेल्या ५० मुलांच्या आई

त्यादिवशी अंधश्रद्धेमुळे ९०० पेक्षा जास्त लोकांनी केली होती आत्महत्या; जाणून घ्या ‘त्या’ भयानक घटनेबद्दल

ठरलं! लोकसभेला ४०० जागा कशा जिंकायच्या, प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्यात बैठक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.