सोनू पुन्हा आला मदतीला धावून; विधवा महिलेला अशी काही मदत केली तुम्हालाच आश्चर्य वाटेल..

 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांचे रोजगार गेले होते, तसेच सर्व प्रवासी सेवा सर्व बंद करण्यात आल्या होत्या, यावेळी अभिनेता सोनू सूदने अनेक लोकांना मदत केली होती.

सोनूने स्थलांतरित मजुरांना, वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना, तसेच अनेकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत केली होती. तेव्हा पासून त्याचे मदत करण्याचे सत्र सुरू झाले आहे.

आता पुन्हा एकदा सोनू सूद मदतीला धावून आला आहे. एका विधवा महिलेचे मुसळधार पावसामुळे घर पडले होते त्यानंतर सोनू सूदने तिला मदत करत घर बांधून दिले आहे.

पावसामुळे एका विधवा महिलेचे घर उध्वस्त झाले होते. यानंतर या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. घर उध्वस्त झाल्याने तिचे सर्व काही संपले होते.

त्यानंतर सोनू सूद तिच्या मदतीसाठी धावून आला आहे. सोनूने त्या महिलेला घर बांधून दिले आहे. या घराचे नाव ‘सोनू सूद निवास’ असे ठेवलेले आहे, सध्या या घराचे फोटो खूप व्हायरल होत आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.