मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण

आपल्या देशामध्ये सध्या बॉलीवूडच नाही. तर सगळ्या भाषेतील चित्रपट खुप प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये साउथ फिल्म इंडस्ट्रीचा खुप मोठा वाटा आहे.

आज आपण साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अशा एका कलाकारबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होतात. पण त्याचे वडील आजही बस चालवतात.

कलाकार फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात. पण जेव्हा त्यांना इथे यश मिळाययला लागते. ते आकाशात पोहोचतात. पण सर्वजण तसेच नसतात.

काही कलाकार यशाच्या शिखरावर पोहोचले. तरी त्यांचे पाय जमिनीवर असतात. त्यामूळे काही कलाकार लोकांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण करतात.

हा अभिनेता त्याच्या करिअरच्या शिखरावर आहे. पण त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत. हा अभिनेता ‘केजीएफ’ फेम यश

सध्याच्या घडीला यश कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. त्याने ‘केजीएफ’सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे.

यशने त्याच्या अभिनय करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली होती. तो कोणत्याही सुपरस्टार फॅमिलीमधून येत नाही. त्याने स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली आहे.

यशचे संपूर्ण नाव नवीन कुमार गोंडा आहे. त्याचा जन्म अरुण कुमार यांच्या घरी झाला. यशचे वडील अरुण कुमार कर्नाटक एसटी महामंडळात काम करतात. ते एक बस ड्रायव्हर आहेत.

यशच्या करीयरची सुरवात छोट्या पडद्यावरून झाली आणि २००७ मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘जंबडा हुडूंगी’ (Jambada Hudugi) हा आला. यशने आपल्या १२ वर्षाच्या फिल्म करीअरमध्ये १८ सिनेमात काम केले आहे.

त्याच्याकडे तब्बल ४० करोडची संपत्ती आहे. यशकडे बंगलोर येथे ३ करोडचा बंगला आहे. पण यशचे वडील आजही बस चालवतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे.

त्याच्या कडे ऑडी क्यू सेवन , रेंज रोवर अश्या गाड्या देखील आहेत. एका सिनेमा करिता यश ४ ते ५ करोड रुपये एवढी फी घेतो. पण तरीही त्याचा वडिलांना त्यांची नौकरी खुप पसंत आहे.

एका मुलाखातीत त्यांने हा खुलासा केला होता कि, ‘त्याचे वडील आजही बस चालवितात. यावर अरुण कुमार यशचे वडील सांगतात कि ‘माझ्या या कामामुळे मी मुलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो. त्यामुळे हे काम मी मधेच सोडणार नाही.’

यशने राधिका पंडीतसोबत लग्न केले आहे. दोघाची भेट ‘नंदा गोकुल’ या टीव्ही सिरीयल दरम्यान झाली होती. दोघांनी लपून बंगलोर येथे लग्न केले.

त्यानंतर त्यांनी रिसेप्शन ठेवले आणि यामध्ये संपूर्ण कर्नाटक मधील जनतेस आमंत्रण दिले होते. दोघाला एक मुलगी देखील आहे. २०१७ मध्ये यश आणि राधिकाने मिळून यशमार्ग नावाची एक सेवाभावी संस्था सुरु केली.

हि संस्था गरजू लोकांना मदत करते. कर्नाटक मधील दुष्काळ पडलेल्या कोप्पाल जिल्ह्यात त्यांनी ४ करोड रुपये खर्च करून तलाव देखील बनविले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.