मुंबई : काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ सुरू आहे. तर काही शहरांमध्ये पेट्रोल शंभरी पार केले गेले आहे. तर अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर आहे. पेट्रोलच्या दरात सुरू असलेली वाढ अशीच वाढत राहिल्यास अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतक गाठेल, अशी परिस्थिती आहे.
याचाच धागा पकडत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून केंद्रातल्या केंद्र सरकारला लक्ष केले आहे. याबाबत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले आहे. त्या म्हणतात, “गेल्या साडे सहा वर्षांत सरकारने डिझलवरचं उत्पादन शुल्क ८२० टक्क्यांनी तर पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क २५८ टक्क्यांना वाढवलं.”
"I fail to understand how any government can justify such thoughtless and insensitive measures directly at the cost of our people."
– Congress President Smt. Sonia Gandhi writes to PM Modi on rising fuel prices. pic.twitter.com/qqBV1Lj0RM
— Congress (@INCIndia) February 21, 2021
“अशा प्रकारे सरकारने जनतेकडून २१ लाख कोटी रुपये कमावले. हा पैसा त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे ज्यांच्यासाठी तो गोळा करण्यात आला,” असल्याचे पुढे पत्रात सोनिया गांधी यांनी म्हंटले आहे.
‘लोकांच्या त्रासातून फाय़दा कमवत असल्याचा आरोप केला आहे. ईंधन आणि गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्रास होत आहे. हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला पत्र लिहित असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे. याचबरोबर सरकारने हे वाढते दर मागे घ्यावेत आणि सामान्य, नोकरदार, शेतकरी, गरिबांना याचा फायदा पोहोचवावा, अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राहुल वैद्यला मागे टाकत रुबीना दिलैक ठरली बिग बॉस १४ची चॅम्पियन…
पूजा चव्हाण आत्मह.त्या! पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच तृप्ती देसाईं जोडले हात अन्…
सावधान! कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपेक्षाही जास्त धोकादायक, एम्स प्रमुखांनी केलं सावध