सोनिया गांधींनी ओबीसी आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

 

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण संस्थात राष्ट्रीय पात्रता चाचणी (NEET) मधून भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये ओबीसींना आरक्षण नसल्याकारणाने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे.

केंद्र सरकारच्या असणाऱ्या संस्था सोडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही. या आरक्षणासाठी सोनिया गांधींनी मोदींना पत्र लिहिले आहे.

पत्रामधून सोनिया गांधींनी मोदींना आग्रह केला आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्येही इथून पुढे ओबीसी आरक्षण लागू करण्यात यावे.

या संस्थांमध्ये ओबीसी उमेदवारांना आरक्षण नसणे भारत सरकारच्या ९३ व्या संशोधनाच्या उद्देशाचे उल्लंघन करत असल्यामुळे योग्य ओबीसी उमेदवाराला वैद्यकीय शिक्षण मिळण्यासाठी अडचण होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.