गाणी दाखवायची सोडून तुम्ही हे काय दाखवताय.? इंडियन आयडलच्या ‘शो’वर प्रेक्षक संतापले

मुंबई । एकेकाळी सर्वांचा आवडता शो असलेला इंडियन आयडल आता गेल्या काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहे. यामुळे प्रेक्षक यावर टीका करत आहेत. सुरुवातीला या शो मधून अनेकांना प्रसिद्धी, पैसा मिळवला. यामुळे अनेकांनी याचा फायदा करून घेतला.

या शोद्वारे अनेकांन बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. मात्र आता या ‘शो’वर टीका केली जाते. आता यामध्ये चाललेल्या ड्रामेबाजीमुळे प्रेक्षक संतापले आहेत. मात्र असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा या शोमध्ये दाखवला गेला.

सध्या इंडियन आयडलच्या एका भागात विशेष पाहुणे म्हणून अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांना बोलावण्यात आले होते. दरम्यान या सेलिब्रिटींच्या मदतीने स्पर्धक सायली कांबळेच्या पालकांसोबत मेकर्सने असे काही केले की त्यांच्यावर टीका होत आहे.

यावेळी कुमार सानू सायलीच्या आईला विचारतात मग तुमचे मिस्टरही रोमँटिक आहेत की नाही? त्यावर सायलीची आई उत्तर देते की नाही. त्यांनी तुम्हांला कधी डेटवर नेले की नाही? सायलीची आई नाही असे उत्तर देते.

यावर एकच हशा पिकतो, यावर कुमार सानू म्हणतात, आज इथे तुमच्यासाठी कँडल लाईट डिनर आयोजित केले आहे. तुम्हा दोघांची डेट इथेच आहे. हे दोघे रोमान्स करणार आणि मी गाणे गाणार. मग दोघांसाठी स्टेजवरच एक डिनर डेट आयोजित केली जाते. यामुळे प्रेक्षक खुप संतापले.

या सर्व गोष्टीवर सध्या टीका केली जात आहे. या शोमध्ये गाणी दाखवायची सोडून तुम्ही हे काय दाखवताय.? यामुळे या विडिओवर प्रेक्षकांनी टीका केली आहे. हा व्हिडीओ सोनी वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या ‘शो’वर सतत टीका केली जात आहे.

ताज्या बातम्या

“मोदींनी प्रचारसभा घेऊन स्वत: कोरोना पसरवला, आणि आता रडत आहेत”

फोर्डच्या या इलेक्ट्रिक कारने बाजारात घातला धुमाकूळ, एका दिवसात झाल्या २० हजार बुकिंग

त्या ८ महिन्यांच्या गरोदर होत्या, मात्र दिवस-रात्र काम करून बनवले कोरोना चाचणीचे किट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.