या’ अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते सोनाली बेंद्रेचे नाव; एक तर होता विवाहित

९० चे दशक बॉलीवूडसाठी खुप खास होते. कारण या कालावधीत फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक नवीन चेहरे लाँच झाले होते. यातले काही कलाकार स्टार किड्स होते. तर काही कलाकार बाहेरून आले होते. प्रत्येकाने बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यासाठी खुप जास्त मेहनत घेतली होती.

९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये अनेक स्टार किड्सने डेब्यु केला होता. यातले काही सुपरस्टार झाले. तर काही फ्लॉप झाले. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. ती अभिनेत्री बॉलीवूडमध्ये बाहेरून आली होती. पण तरीही तिने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

या अभिनेत्रीचे नाव आहे सोनली बेंद्रे. बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये सोनालीचा समावेश होतो. ९० च्या दशकातील यशस्वी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिच्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोनालीने १९९४ मध्ये रिलीज झालेल्या ‘आग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. या चित्रपटात अभिनेते गोविंदा मुख्य भुमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पण सोनाली मात्र बॉलीवूडमध्ये हिट झाली होती.

सोनालीच्या सुंदरतेवर अनेकजण घायाळ झाले होते. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. या कालावधीमध्ये तिने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टारर सिनेमांत काम केले आहे. सोनालीला चित्रपटांमध्ये हवे तसे यश मिळवू शकली नाही.

पण तरीही सोनाली बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर देत होती. शाहरुख खानसोबत इंग्लिश बाबू देशी मेम, सलमान खानसोबत हम साथ साथ है, आमिर खानसोबत सरफरोश, अमिताभ बच्चनसोबत मेजर साहब, अजय देवगनसोबत दिलजले, जख्म आणि अक्षय कुमारसोबत तराजू हे सोनालीचे काही हिट चित्रपट आहेत.

९० च्या दशकात सोनली बेंद्रेचे नाव अक्षय कुमार, सुनील शेट्टी अशा अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. पण सुनील शेट्टीसोबत तिच्या अफेअरची चर्चा खुप जास्त रंगली होती. सुनील शेट्टी अगोदरच विवाहित होते. म्हणून या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.

त्यानंतर सोनालीचे नाव राज ठाकरेसोबत जोडले गेले होते. हे त्या काळी बॉलीवूडचे सर्वात जास्त चर्चेत असणारे अफेअर होते. असे बोलले जाते, सोनालीला राज ठाकरेसोबत लग्न करायचे होते. पण राज यांना राजकारणात प्रवेश करायचा होता. म्हणून या दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि हे दोघे वेगळे झाले.

सोनालीने आपल्या ११ वर्षांच्या करिअरमध्ये ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. फक्त बॉलीवूडच नाही तर तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. पण जास्त काळ ती बॉलीवूडमध्ये कार्यरत नव्हती.

२००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘कल हो ना हो’ चित्रपटानंतर सोनालीने बॉलीवूडमधून ब्रेक घेतला होता. दहा वर्षानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ सिनेमातून सोनालीने कमबॅक केला होता. पण तिला काही खास यश मिळाले नव्हते.

अभिनेते गोविंदाने सोनाली बेंद्रेबद्दल एक खुलासा केला होता. त्यावेळी ती खुप जास्त चर्चेत आली होती. ते म्हणाले होते की, ‘सोनाली बेंद्रे माझ्यामुळे बॉलीवूडमध्ये आली आहे. मी तिला बॉलीवूडमध्ये काम दिले आहे’.

यावर सोनालीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. काही दिवसांपूर्वी सोनालीला कॅन्सर झाला होता. तिने अनेक दिवस कॅन्सरसोबत लढा लढला आहे. त्यावेळी देखील ती खुप जास्त चर्चेत आली होती. सोनालीने कॅन्सरकर मात केली आहे आणि आज ती तिच्या कुटुंबासोबत आनंदाने राहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महावीर शाह एक असे अभिनेते ज्यांच्या मृत्यूने सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता

शेखर सुमनने ‘उत्सव’ चित्रपटात रेखासोबत दिले आहेत अनेक इंटिमेट सीन्स; तुमचा विश्वास बसणार नाही

बापरे! परत माझ्यासोबत असा वागला तर बघ; जॅकी श्रॉफने अनिल कपूरला दिली होती धमकी

८० च्या दशकात लग्न न करता आई झाली होती ‘ही’ अभिनेत्री; आज मुलगी आहे प्रसिद्ध डिझायनर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.