सोनाली बेंद्रे आहे करोडोंच्या संपत्तीची मालकीण; पहा तिच्या घराचे फोटो

४६ वर्षांची सोनाली बेंद्रे आज फिल्मी पद्यापासून पुर्णपणे दुर असली तरी तिचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. आजही लोकं तिचे तेवढेच वेडे आहेत जेवढे ९० च्या दशकात होते. आपल्या मनमोहक अदांनी चाहत्यांना वेड लावणारी सोनाली सध्या कुटुंबासोबत फॅमिली टाईम एन्जॉय करत आहे.

१ जानेवारी १९७५ मध्ये सोनाली बेंद्रेचा जन्म मुंबईत झाला होता. कॉलेजनंतर अभिनय क्षेत्रात आलेली सोनाली ९० च्या दशकात तरुणांच्या मनावर राज्य करत होती. ती कधीही माधुरी, जुही चावला किंवा काजोलप्रमाणे टॉप अभिनेत्री बनू शकली नाही.

पण तरीही सोनालीचा चाहता वर्ग खुप मोठा होता. १९९४ मध्ये ‘आग’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. बॉलीवूडच्या प्रत्येक मोठ्या कलाकारासोबत तिने काम केले. ती दिवसेंदिवस यशस्वी अभिनेत्री बनत होती.

करिअरसोबतच सोनाली तिच्या वैयक्तिक आयुष्यमूळे देखील नेहमीच चर्चेत राहायची. सुनील शेट्टीसोबत तिचे अफेअर खुप गाजले होते. विवाहित सुनील शेट्टीच्या प्रेमात ती पागल झाली होती. त्यानंतर तिचे नाव राज ठाकरेसोबत देखील जोडले गेले होते. पण नंतर या सगळ्या अफवा निघाल्या.

पण २००२ मध्ये सोनालीने निर्माता गोल्डी बेहलसोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाला १८ वर्ष पुर्ण झाली आहेत. पण तरीही त्यांचा संसार सुखाचा सुरू आहे. सोनाली चित्रपटांपासून दुर असली तरी करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे.

सोनालीचा पती बॉलीवूडमधला प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्यामुळे तिच्याकडे पैशांची कमी नाही. मुंबईच्या आलिशान भागात तिचे घर आहे. तिच्या घराची किंमत १०० करोड पेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे सोनालीच्या घराचे डिझाइन शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले आहे.

अतिशय सुंदर पद्धतीने गौरीने सोनालीच्या घराला सजवले आहे. घराच्या सजावटीसाठी तिने करोडो रुपये खर्च केले आहेत. म्हणून तिचे घर दिसायला खुपच सुंदर आहे. सोनालीच्या घरातील प्रत्येक कोपरा सुंदर सुंदर गोष्टींनी सजवलेला आहे.

घरासोबतच सोनाली अनेक महागड्या गाड्यांची मालकीण आहे. तिचे कार कलेक्शन खुप मोठे आहे. २०१८ मध्ये सोनाली कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत होती. आज ती आनंदी आणि आरोगी आहे. लवकरच ती कमबॅक करणार असल्याचे बोलले जाते.

महत्त्वाच्या बातम्या –

सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या पत्नीच्या फोटो; दिसते खुपच सुंदर

पारदर्शक कपडे घालून फोटोशुट करणे अभिनेत्रीला पडले महागात; लोकं म्हणाले थोडी तरी लाज ठेव; पहा फोटो..

रेमडेसिवीर टंचाईचे खापर अभिमन्यु काळेंवर फोडणाऱ्या ठाकरे सरकारवर सेना नेत्याचीच सडकून टिका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.