महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’ साकारणार सोनाली कुलकर्णी; पहा फस्ट लुक

मुंबई | आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या साथिदारांवर अनेक सिनेमे आणि मालिके आले. पण आता छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी ताराराणी यांच्यावर एक सिनेमा येऊ घातला आहे. राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चरित्रग्रंथावर आधारित या चित्रपटात ताराराणीची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. क्रिएटिव्ह मदारी प्रस्तुत या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून त्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे.

औरंगजेबासारख्या क्रूर,बलाढ्य आणि महत्वाकांक्षी पातशहाला लढा देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा आणितिचे वैयक्तिक आयुष्य प्रेक्षकांना ‘छत्रपती ताराराणी’च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात होणार आहे.

‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जाधव सांगतात, ”छत्रपती ताराराणी चित्रपटाद्वारे फक्त एक व्यक्तिचित्र रेखाटण्याचा नाही तर एक अद्वितीय व्यक्तिमत्व जगापुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, ज्याचा आदर्श आजच्या पिढीने, विशेषतः स्त्रियांनी जरूर घ्यावा. कारण त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. स्त्रीशक्ती आणि स्त्री नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती ताराराणी.

शक्तीसोबत युक्तीचा आणि सामर्थ्यासोबत संयमाचा सुरेख संगम म्हणजे छत्रपती ताराराणी. त्या खऱ्याखुऱ्या सुपरहिरो आहेत आणि अशा सुपरवुमनचा आदर्श ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुढच्या पिढीसमोर ठेवताना एक दिग्दर्शक म्हणून मला अत्यंत समाधान वाटत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या
अमित शहा नेपाळ व श्रीलंकेतही भाजपचे सरकार आणणार आहेत; भाजप मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे
फोनचा पासवर्ड विसरलात? ‘या’ काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून क्षणात करा अनलॉक
काळजी घ्या! चुकूनही स्कॅन करू नका क्यूआर कोड, अन्यथा रिकामं होईल तुमचं अकाऊंट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.