शेतकऱ्यांसाठी सोनाक्षी सिन्हा मैदानात; स्वत:च्या आवाजात शेअर केली कविता

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपेक्षाही जास्त दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत. अशातच काही आंतरराष्ट्रीय आणि भारतील कलाकारांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही आता शेतकरी आंदोलनाला समर्थन देत सोशल मिडियावर एक स्वत:च्या आवाजातील कविता शेअर केली आहे. शेतकरी आंदोलनातील फोटो या कवितेमध्ये असून या कवितेमधून तिने सवाल केला आहे.

वरद भटनागर याने ही कविता लिहिली असून आतापर्यंत ८ लाखापेक्षा जास्त सोशल मिडिया युजर्सनी कविता पाहिली आहे. तिच्या कवितेला शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.

 

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही कविता शेअर केलेली आहे. तिच्या या कवितेवर दिल जीत लिया आपने, आपने नाम को सच कर दिया, थँक्यू सो मच सोनाक्षी, अशा कमेंट्स करत सोनाक्षीचे कौतूक केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
वाचा अभिनेत्री टिना मुनीम आणि बिजनेस मॅन अनिल अंबानीची हटके लव्ह स्टोरी
चहलच्या बायकोसोबत श्रेयस अय्यरने केलेला ‘हा’ डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील; पहा व्हिडीओ…
शिवसेना माझं पहिलं प्रेम; ‘व्हेलंटाईन डे निमीत्ताने सात नगरसेवक माझ्याकडून भेट’
आता शेतकऱ्यांना मिळणार ३००० रुपये प्रतिमहिना पेन्शन, ‘या’ सरकारी योजनेचा मोफत लाभ मिळवा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.