अखेर ठरलंच! सलीम खान यांच्या घरची सुन बनणार बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, सलमान खान सोबत केलय सिनेमात काम

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच तिच्या नात्याबद्दल बोलली आहे. तिने सांगितले की तिचे पहिले रिलेशनशिप वयाच्या 20 व्या वर्षी झाले आणि ते बरेच दिवस टिकले. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगीही तिच्या आयुष्याबद्दल चर्चेत असते.

दबंग आणि राउडी राठौर सारख्या दमदार चित्रपटातून नाव कमावणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चाही सध्या जोरात सुरू आहेत. शत्रुघ्नची लाडली लवकरच बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खानची नातेवाईक बनणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

अरबाज खानच्या बायकोचा भाऊ बंटी सचदेवा हिच्यासोबत सोनाक्षी सिन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. अनेकवेळा त्यांना एकत्र पाहण्यात आले आहे. पण सोनाक्षी लहानपणीच कुणाच्यातरी प्रेमात वेडी झाली होती हे फार कमी लोकांना माहीत आहे.

बॉलीवूड बबलसोबतच्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, जेव्हा ती शाळेत होती तेव्हा तिला खरे प्रेम झाले होते. जेव्हा तिने डिग्री पुर्ण केली तेव्हा तिने त्याला ‘ओके बाय’ म्हटले. तिचे पहिले रिलेशनशिप खुप सिरीअस होते जे 5 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकले.

ती म्हणाली, ‘मला वाटतं माझं पहिलं सिरीअस रिलेशनशिप ५ वर्ष चालले तेव्हा मी २१ किंवा २२ वर्षांची होते.’ सोनाक्षी सिन्हा पुढे म्हणाली, ‘तुम्ही तुमच्या नात्यांमधून नेहमीच शिकले पाहिजे आणि पुढे चालत राहिले पाहिजे, कारण प्रत्येकजण वेगळा असतो, प्रत्येकाचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व असते.

तुम्हाला फक्त अशी व्यक्ती शोधावी लागेल जी तुम्हाला सहन करण्यास तयार असेल. खरं तर मी खूप काही शिकले. तुम्ही बदलता, तुम्ही वाढता, तुमचे अनुभव तुम्हाला खूप काही शिकवतात. मी अधिक काम करू लागले. मी बर्‍याच नवीन लोकांना भेटले, त्यांच्याकडून बरेच काही शिकले आणि मला वाटते की हे सर्व तुम्हाला एक व्यक्ती म्हणून बदलते.

तुम्हाला अशी एखादी व्यक्ती शोधावी लागेल जी तुम्हाला ओळखेल आणि तुमच्यावर प्रेम करेल. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनाक्षी सिन्हा अजय देवगन स्टारर ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ मध्ये दिसली होती. सोनाक्षी लवकरच रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय दिग्दर्शित वेब सीरिजद्वारे डिजिटल पदार्पण करणार आहे.

या शोमध्ये ती महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह यांच्याही भूमिका आहेत. सोनाक्षी सिन्हा तिच्या भूमिकांसाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. अकिरामध्ये केलेल्या तिच्या भूमिकेसाठी तिला खुप पसंत करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या
मोफत एलपीजी कनेक्शनच्या नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या बदलेले नवीन नियम
राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंचा पराभव; राज्यात खळबळ
दिलदार माही! १४५० किमी पायी चालत आलेल्या चाहत्याला फार्म हाऊसवर थांबवले आणि विमानाने घरी पाठवले
रेल्वेत भगव्या कपड्यांमध्ये वेटर दिसल्याने संत भडकले, रेल्वेने तातडीने घेतला मोठा निर्णय..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.