असे म्हणतात प्रेम आंधळे असते. पण या आंधळ्या प्रेमातून अनेक धक्कादायक घटना घडत असतात. आता उत्तर प्रदेशच्या बीजनोरमधून एक भयानक घटना समोर समोर आली आहे. प्रियकरासाठी एका आईने आपल्या पोटच्याच मुलाचा जीव घेतला आहे.
मुलाने आपल्या आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले होते. त्यामुळे आई खूप घाबरली होती. मुलगा आपल्या संबंधांबद्दल घरात सांगेल याची भीती वाटत होती. त्यामुळे तिने प्रियकराच्या मदतीनेच आपल्या मुलाचा जीव घेतला आहे.
मुलाचे नाव वरुण असे होते आणि तो १० वर्षांचा होता. १६ जानेवारीला मुलाचा मामा उमेश कुमारने पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर पोलीस त्याचा तपास करत होते. अशात १७ जानेवारीला संध्याकाळी तो जंगलात सापडला. त्यानंतर शवविच्छेदनात गळा दाबून मुलाचा जीव घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी मुलाची आई मुन्नी आणि तिचा प्रियकर टिंकुला अटक केली आहे. त्यांनी सुद्धा या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जानेवारी महिन्यात मुन्नीचा पती बाहेर गावी गेला होता. हीच संधी साधून टिंकू तिच्या घरी गेला होता. त्यावेळी ते दोघेच घरी होते.
ते दोघे घरी असताना अचानक वरुण घरी आला आणि त्याने त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. त्यावेळी वरून आता ही गोष्ट त्याचा वडिलांना सांगेन याची भीती त्या दोघांना होती. त्यामुळे त्यांनी गळा दाबून त्याचा जीव घेतला. वरुणचा मृतदेह तीन तास घरात होता. त्यानंतर त्यांनी तो मृतदेह जंगलात फेकला होता.
मुलाने आई आणि तिच्या प्रियकराला पाहिले होते तेव्हा तो म्हणाला होता की पप्पा घरी आल्यावर त्यांना मी हे सांगणार आहे. हे ऐकल्यानंतर त्याची आई खूप घाबरली होती. आपले अनैतिक संबंध सर्वांसमोर या भीतीनेच तिने पोटच्या मुलाचा जीव घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
जुनेजाणते कुस्तीपटू अस्लम काझींनी सिकंदरला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, आता हार मान्य कर आणि….
बागेश्वर महाराजांनी स्विकारलं 30 लाखांचं चॅलेंज, पण.. अंनिसने घातली ‘ही’ मोठी अट
“वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा”; शिवसेना नेत्याने शेअर केलेले ‘ते’ फोटो चर्चेत; पहा फोटो…