माधुरी दिक्षीतचा मुलगा एवढा स्मार्ट आहे की मोठमोठे बाॅलीवूड हिरोही पडतील फिके; पहा फोटो

९० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये माधुरी दीक्षितचे राज्य होते. तिने तिच्या सुंदरतेने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली होती. आजही माधुरी दीक्षितचे लाखो चाहते आहेत.

माधुरी दीक्षितने तेजाब, परींदा, हम आपके है कौन, अंजाम यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. फक्त अभिनयच नाही तर माधुरीने तिच्या डान्सने देखील अनेकांना वेड लावले आहे.

डान्स, सौंदर्य आणि दमदार अभिनय या गोष्टींमूळे ती बॉलीवूडमध्ये खुप लवकर प्रसिद्ध झाली होती. चित्रपटांसोबतच तिचा स्वभाव देखील खुप सुंदर होता. त्यामूळे ती अनेकांना आवडत होती. ती ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री झाली होती.

पण १९९९ मध्ये माधुरी दीक्षितने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तिला खुप लवकर लग्न करत आहेस असे सांगितले. पण तिने काही ऐकले नाही. शेवटी १९९९ मध्ये माधुरी दीक्षितने डॉक्टर श्रीराम नेनेसोबत लग्न केले.

माधुरीने लग्न केले त्यावेळी तिच्या नवऱ्याला ती अभिनेत्री आहे. ही गोष्ट माहीती नव्हती. कारण ते अमेरिकेतील प्रसिद्ध सर्जन होते. ते तिथेच राहत होते. पण त्यांना भारतीय मुलीसोबत लग्न करायचे होते.

त्यामूळे त्यांनी लग्नाला होकार दिला. पण ज्यावेळी त्यांना माधुरीच्या स्टारडमबद्दल समजले त्यांना धक्का बसला. पण ते काही करू शकत नव्हते. कारण माधुरीने लग्नानंतर अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला होता.

लग्नानंतर माधुरी दीक्षित अमरिकेत शिफ्ट झाली. कारण तिचा नवरा अमेरिकाचा प्रसिद्ध सर्जन होता. लग्नानंतर माधुरी दीक्षितला आरिन आणि रेयाने ही दोन मुले झाली. लग्नानंतर अनेक वर्षे ती अमेरिकेतच होती.

पण काही वर्षांपूर्वी ती भारतामध्ये परत आली. ती आत्ता तिच्या पूर्ण फॅमिलीसोबत मुंबईत राहते. माधुरी दीक्षित सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती तिच्या मुलांच्या अनेक फोटो शेअर करत असते.

माधुरीने तिचा मोठा मुलगा आरिनचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच तिने त्या फोटोला कॅपशन देखील दिले आहे. ती म्हणाली समजलेच नाही कधी एवढा वेळ गेला. माझा मोठा मुलगा आरिन सोळा वर्षांचा झाला आहे.

माधुरी दीक्षितचे दोन्ही मुले दिसायला खुप हँडसम आहेत. मोठा मुलगा सेम त्याच्या वडिलांसारखा दिसतो. असे बोलले जात आहे की, माधुरीचा मुलगा लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यु करू शकतो. पण माधुरीची इच्छा आहे की तिच्या मुलांनी बॉलीवूडपासून लांब राहावे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.