..आणि त्याने मावशीसोबत पळून जाऊन केलं लग्न, आता मुलगाच बनला बापाचा साडू

झारखंडमधील चतरा येथे एक विचित्र घटना घडली आहे. एका तरूणाने चक्क आपल्या मावशीसोबतच लग्न केल्याची घटना समोर आली आहे. घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केल्यानंतर त्यामध्ये पोलिसांना मध्यस्थी करून प्रकरण सोडावे लागले.

पोलिसांनी हे प्रकरण शांतपणे सोडवले नाहीतर प्रकरण खुप चिघळले होते. झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील रक्सी गावातील हे प्रकरण आहे. रक्सी गावातील सोनू राणा याचे आपल्या चुलत मावशीशी प्रेमसंबंध होते. दोघेही एक वर्षापासून एकमेकांवर प्रेम करत होते.

एक दिवशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २ एप्रिलला त्यांनी एका मंदिरात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने नात्याने मावशी लागणाऱ्या तरूणीशी पळून जाऊन लग्नही केले. त्यांच्या लग्नाला गावकऱ्यांनी खुप विरोध केला कारण हे लग्न अल्पवयीन असल्याने त्यांचे लग्न कायद्याने चुकीचे आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे होते.

एका रात्री दोघेही त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरात थांबले होते. त्यांनी रात्र कशीतरी काढली आणि सकाळी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. सोनू राणा आणि त्याची मावशी दोघेही अल्पवयीन होते त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना स्थानकात बोलावून घेतले.

पोलिसांनी दोघांच्याही घरच्यांना समजावून सांगितले पण दोन्हीकडचे कुटुंबीय काहीही ऐकायला तयार नव्हते. ते या लग्नाला आनंदी नव्हते. मात्र काहीही झालं तरी दोघेही एकमेकांपासून वेगळे व्हायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी खुप समजवल्यानंतर एक बॉन्ड लिहून घेतला आणि आशिर्वाद घेऊन त्यांना घरी पाठवण्यात आले. पोलिसांमुळे हे प्रकरण मिटले.

महत्वाच्या बातम्या
याला म्हणतात माणुसकी! शीख सैनिकाने पगडी काढून बांधल्या सहकाऱ्याच्या जखमा
काका ऋषी कपूरसोबत रोमान्स करण्याचा हट्ट करून बसली होती करिश्मा; त्यांनी दिला ‘हा’ सल्ला
दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हणणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांचा अर्धनग्न व्हिडीओ झाला व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.