प्रेम आंधळे असते असे म्हणतात. राजस्थानमधील सिरोह जिल्ह्यात सासू आणि जावई यांची प्रेम कथा उघडकीस आली आहे. ४० वर्षीय सासू आणि २७ वर्षीय जावई एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि प्रेमात इतके बुडाले की सासऱ्याला एक दिवस जावायाने खुप दारू पाजली ज्यामुळे ते बेशुद्ध पडले.
प्रेम आणि युद्धात सगळे माफ असते. ही विचित्र घटना अनादरा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. सासू आणि जावयामध्ये एवढे प्रेम रंगले की जावयाने त्याची बायको आणि सासूने नवऱ्याला सोडून रविवारी पळ काढला. सासऱ्याने जावई नारायण जोगी याच्या विरोधात पोलीस तक्रार केली आहे.
नारायण जोगीचे लग्न किसन यांच्याशी झाले होते. लग्नानंतर मुलगी आणि जावई घरी येत असत. नेहमीप्रमाणे ३१ डिसेंबरला ते दोघे घरी आले होते. नवीन वर्षाच्या निमित्ताने सासरा रमेश आणि जावयाने पार्टी केली.
सासरा रमेशला दारू पिल्यामुळे बेशुद्ध झाला. रमेश दारूमुळे बेधुंद झाला होता. पहाटे चार वाजता जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याची पत्नी आणि जावई बेपत्ता झाले होते. शोधाशोध केली तरी सापडले नाहीत.
रमेशची मुलगी तिच्या सासरीच होती. तिला सकाळी हा सगळा प्रकार समजला. सासरा रमेश याला तीन मुली आणि एक मुलगा आहेत. तिघंही मुलींची लग्न झाले आहेत. जावयाला तीन मुलीही आहेत. जावई-सासू पळून गेले आहेत सोबतच जावयाने एका मुलीलाही सोबत घेऊन नेले आहे.
या सगळ्यामुळे सासऱ्याला अजूनच धक्का बसला आहे. पोलीस पळून गेलेल्या जावई आणि सासूचा शोध घेत आहेत