कोरोनाग्रस्त आईला मुलगा व सून रुग्णालयात सोडून गेले; नर्सने आईसारखे सांभाळले आणि..

गेल्या काही दिवसांपासून देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. जवळपास एका वर्षांपासून आपण या संकटाचा सामना करत आहे. यामध्ये अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना रांचीमध्ये घडली आहे. मुलाने आणि सुनेने त्यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये भरती करून तेथून पळ काढला आहे. आणि पुन्हा ते आपल्या आईची चौकशी करण्यासाठी सुद्धा आले नाहीत.

मात्र दवाखान्यातील नर्स आणि डॉक्टरांनी माणुसकी जिवंत ठेवून या महिलेचे उपचार केले आहेत. तसेच अगदी घरच्या प्रमाणे तिची काळजी घेतली आहे. ६२ वर्षीय ही महिला रुग्णालयात दाखल करून तिच्या घरचे निघून गेले. यानंतर या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. असे असतानाही परत तिच्या घरचे तिच्या बद्दल चौकशी करायला आले नाहीत.

कोरोनाच्या महामारीत एका बाजूला अनेक कुटुंब आपल्या घरच्यांसाठी ऑक्सीजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन, तसेच इतर औषधांसाठी पळापळ करत आहेत. मात्र या महिलेसाठी तिला बघायला कोणीही आले नाही.

असे असताना हॉस्पिटल प्रशासनाने या महिलेची काळजी घ्यायची सुरूच ठेवली. डॉ.एस अली, डॉ. वरुण यांनी त्यांच्यावर उपचार केले. या महिलेला सर्व औषधे देऊन तिची काळजी घेऊन तिला कोरोनातून बरे केले आणि तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.

रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील कोणीही तिला बघायला आले नाही. असे असताना डॉक्टरांनी एक निर्णय घेतला या महिलेला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याठिकाणी तिची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार होती.

तिला खाण्यापिण्याची देखील सोय त्या ठिकाणी होती. उपचार सुरू असल्यापासून आत्तापर्यंत हॉस्पिटल प्रशासनाने तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचे देखील सुरू ठेवले आहे. मात्र अजूनही त्यांचा शोध लागला नाही. हॉस्पिटल मधील डॉक्टर अजित कुमार यांनी यासाठी त्यांचा नंबर देखील दिला आहे.

या महिलेच्या कुटुंबातील कोणाचा शोध लागला तर त्यांनी 94 31 18 25 97 आणि 74 88 34 04 85 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मात्र तिच्यासाठी हॉस्पिटलने एवढे कष्ट घेतले यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

ताज्या बातम्या

सर्वांचा फेव्हरेट असणारा ‘हा’ दिग्गज खेळाडू होणार टिम इंडीयाचा नवीन कोच

कर्मचाऱ्याने ऑफिसला गैरहजेरीचे दिले विचित्र कारण; स्वतःला भगवान विष्णूचा दहावा अवतार सांगितला

VIDEO: खड्ड्यात पडलेल्या हत्तीला जेसीबीने बाहेर काढले मग पहा पुढे हत्तीने काय केले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.