हनिमूनच्या पहिल्या रात्रीच झाले असे काही की नवरा-नवरीला हॉस्पिटलमध्ये करावे लागले दाखल

प्रेम विवाह केल्यावर नवदापत्य खूप आनंदी असतात,आपण पाहिले असतील. मात्र बिहारच्या गोपालगंजमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. प्रेम विवाह करणाऱ्या एका नवदाम्पत्यांनी हनिमूनच्या रात्रीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सप्तपदीनंतर मधुचंद्राच्या रात्रीच या जोडप्याने विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

गंभीर स्थितीत नवदाम्पत्याला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथून त्यांना गोरखपूरला रेफर करण्यात आले. या घटनेमुळे दोघांचेही कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कुटुंबीयांना पोलिसांना सांगितले आहे की, जमशेदपूरच्या सोनाटा पोलीस स्टेशन भागात राहणारी २८ वर्षीय शांती देवीने गोपालगंजमधील ३० वर्षीय मुकेश कुमार सिंहसोबत शनिवारी थावे मंदिरात लग्न केले होते.

लग्नानंतर रविवारी घरी जेवणाचा कार्यक्रमही होता. जेवणाच्या कार्यक्रमानंतर पती-पत्नी दोघेही झोपण्यासाठी निघून गेले. मात्र, त्यांनी त्यावेळीच विष खाल्ले. सदर हॉस्पिटलमध्ये प्रेमी जोडप्याला घेऊन आलेल्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोघांनी चिकनमध्ये विष मिक्स करून खाल्ले होते. दोघांनीही विष का खाल्ले याचे कारण कुणालाच माहीत नाही.

रूममध्ये दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. ज्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले. रात्री दोघांवरही इमरजन्सी वार्डात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस येणार असल्याची माहिती मिळताच कुटुंबीय चांगल्या उपचारासाठी दोघांनाही घेऊन फरार झाले. डॉक्टरांनुसार, कपलने विष खाल्ल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उलटी यावी म्हणून सर्फचे पाणी पाजले होते.

त्यानंतरही त्यांची स्थिती सुधारली नाही. त्यानंतर उपचारासाठी त्यांना कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये नेले. याप्रकरणी पोलीस अधिकारी बीएन राय म्हणाले की, प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोघेही बेशुद्ध असल्याने चौकशी करता आली नाही. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

ताज्या बातम्या

तारक मेहतामधील दयाबेनने केले होते बी-ग्रेड चित्रपटात काम; बोल्डनेसची सर्वच हद्द केली होती पार

मोठी बातमी! पंढरपूरच्या पायी वारीसाठी राज्यपालांचा पुढाकार, मुख्य सचिवांना केला फोन, आणि…

….म्हणून काजोलने ‘गदर’सारख्या हिट चित्रपटाला दिला नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.