एकाने राजस्थानला जायला मागितली कार, सोनू सूदने असे काही उत्तर दिले तो झाला तिथेच गार

मुंबई | हिंदी चित्रपटात जरी खलनायक म्हणून अभिनय करणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात अनेक लोकांचा हिरो बनला आहे. हिरोच काय काही लोक तर त्याला देव मानतात. लॉकडाऊनमध्ये त्याने लोकांची केलेली मदत पाहून अनेक जण त्याचे फॅन झाले आहेत.

मजुरांच्या मदतीपासून सुरू केलेला हा प्रवास त्याने असाच पुढे चालू ठेवला आहे आणि आता त्याने व्यापक रूप घेतले आहे. त्याने फक्त भारतातील नाही तर भारताबाहेर अडकलेल्या लोकांचीही मदत केली आहे. इतकेच नाही त्याने बेरोजगार लोकांना रोजगार देण्याचेही ठरवले आहे.

पण काही लोक अशी मदत मागतात की, ही मदत सोनू सूदसुद्धा करू शकत नाही. एकाने सोशल मीडियावर सोनू सुदला एक गाडी मागितली. त्याला पत्नीच्या आजी आजोबांना भेटायला राजस्थानला जायचं होतं. युजर जोर देऊन म्हणाला की, तो स्वतः गाडी चालवत घेऊन जाईल.

सोनुने या युजरला अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर दिले. सोनूने त्याच्या ट्विटला रिप्लाय दिला की, अरे स्वतः का ड्राइव्ह करतो मीच सोडून देतो ना तुला. मला हे ही सांग गाडी कोणती हवी आणि एसीचं तापमान किती हवं हेसुद्धा सांग.

आता सोनुने असे उत्तर दिल्यावर लोकांनाही खूप हसू फुटलं. लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया बोलून दाखवल्या. दरम्यान सोनूला याआधीही अनेक लोकांनी अश्या प्रकारे मदत मागितली होती तेव्हा पण सोनुने अशाच प्रकारे उत्तर देऊन सर्वांना हसायला भाग पाडले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.