‘सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो, आरोपाने राज्यात खळबळ

मुंबई । अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता अडचणीत आले आहेत. ते बिल्डरांसाठी काम करतात, असा धक्कादायक आरोप आता करण्यात आला आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. याबाबत गंभीर आरोप अर्थ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कलमे यांनी केला आहे.

ते म्हणाले, मुकेश दोषी यांची क्रिस्टल प्राइड आणि आनंद पंडित यांची लोटस डेव्हलपर्स या बिल्डरांसाठी किरीट सोमय्या काम करत आहेत. या बिल्डरांकडून सोमय्या यांच्या संस्थेला मोठा निधी मिळतो, असेही ते म्हणाले. यामुळे खळबळ उडाली आहे.

सोमय्या यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. गृहनिर्माण विभाग, म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून १ हजार कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रवीण कलमे यांना दिले आहेत. कलमे हे सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत. असे आरोप सोमय्या यांनी केला होता. यामुळे प्रकरण तापले होते.

आता याबाबत न्यायालयात सोमय्या यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. सोमय्या यांनी अब्रूनुकसानीचे कृत्य केले आहे. असे प्रथमदर्शनी दिसून येत आसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यामुळे आता ते अडचणीत आले आहेत. आता दंडनीय गुन्ह्याची सुनावणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

सोमय्या हे आपल्या जवळच्या बिल्डर मित्रांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शांत आहेत. अनेक इमारती नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. यावर कारवाई करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहारही केल्याचे कलमे यांनी यावेळी सांगितले.

यामुळे आता सोमय्या काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारवर आरोप करणारे सोमय्या या प्रकरणी अडचणीत आले आहेत. यामुळे वातावरण तापले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.