आईसोबत फिरून त्याने विकल्या बांगड्या, पण जिद्दीने IAS अधिकारी होत केले आईच्या कष्टाचे चीज

आपल्या मनाशी एखादी गोष्ट पक्की केली आणि प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. असेच काहीसे केले आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील महागावच्या आयएएस रमेश घोलपने. त्याने एक स्वप्न बाळगले होते, योग्य शालेय शिक्षणाच्या अनुपस्थितीतही त्याने आपला अभ्यास सोडला नाही.

त्याने रात्रीचा दिवस करून आपले ध्येय गाठले आणि शेवटी त्याला यश मिळाले आणि तो सर्वांसाठी आज प्रेरणा आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. रमेश घोलप यांच्या वडिलांना दारूचे व्यसन लागले होते. यामुळे घरात वाद असत.

त्यांच्या आईला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या वडिलांचे देखील लवकर निधन,झाले, तेव्हा ते दहावीतच होते. या परिस्थितीत त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली आणि त्यात ८८ टक्के गुण मिळवले. रमेश आणि त्यांच्या आईला घरगुती खर्च भागवण्यासाठी बांगड्या विकाव्या लागल्या. त्यांचे वडील दारूचे पूर्णपणे व्यसनी बनले होते.

ते दारू पिण्यासाठी बांगड्या विकून त्यांनी मिळवलेले पैसे खर्च करायचे. रमेश वेगवेगळी कामे करून शाळेचा खर्च भागवत होते. ते निवडणूकीच्या घोषणा, वाक्ये तयार करत असत. त्यांनी पंचायतीच्या निवडणुकांसाठी त्यांच्या आईला प्रोत्साहन दिले आणि आईनेही त्यांच्या विनंतीवरून निवडणूक लढवली. त्यांना गावात बरीच मते मिळाली, त्यांचा मात्र पराभव झाला.

तेव्हा रमेश यांनी वचन घेतले की ते अधिकारी होईपर्यंत गावात येणार नाहीत. ते शहरात गेले आणि त्यांनी तहसीलदारांचा अभ्यास करायचे ठरवले, त्यात ते यशस्वीही झाले. पुढे त्यांनी आयपीएस होण्याचा विचार केला, ते पुण्यात गेले. जिथे त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

त्यांनी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. त्यांना मेहनतीचे फळ मिळाले आणि त्यांनी आयपीएस परीक्षेत २८७ गुण मिळवले. आज ते झारखंडमधील मंत्रालयाच्या ऊर्जा विभागात सहसचिव आहेत. त्यांनी यासाठी मोठा संघर्ष केला आहे. आज ते अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.