अरे वाह! आता घराच्या छतावर बसवा सौरउर्जा पॅनेल; केंद्राकडून मिळणार ४० टक्के अनुदान, असा करा अर्ज

महावितरणचे घरगुती वीज कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी, घरगुती, गृहनिर्माण संस्था आणि निवास कल्याण कारी संस्था यांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती उपकरणे बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून ४० टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे महिन्याच्या घरगुती वीज बिलात मोठी बचत होणार आहे.

तसेच उर्वरित वीजही महावितरणच्या वतीने दरवर्षी नेटमीटरिंगद्वारे खरेदी केली जाईल. महावितरणच्या औरंगाबाद मंडळाचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी ही माहिती दिली.

ज्ञानेश्वर आर्दड म्हणाले की, महावितरणचे अध्यक्ष आणि प्रशासकीय संचालक विजय सिंघल यांनी या योजनेचा तपशीलवार आढावा घेतला आणि क्षेत्रीय कार्यालयाला मुंबईतील घरगुती वीज जोडणी असलेल्या ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.

केंद्र शासनाचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रूफटॉप सोलर स्कीम फेज -२ अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॅटचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत घरगुती वीज जोडणी असलेल्या ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती उपकरणे बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल.

यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅट ते १० किलोवॅट मर्यादा असलेल्या घर बांधकाम निवासी संस्थेच्या ग्राहकांसाठी २० टक्के अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार आहे.

महावितरण रूफटॉप सोलर पॉवर जनरेशन मशीनरी बसवण्यासाठी सर्कल निहाई एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची यादी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा महावितरणच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. www.mahadiscom.in या वेबसाईट ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

१ किलोवॅटसाठी ५ वर्षांच्या देखभाल खर्चासह रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी १ किलोवॅट -४६ हजार ८२० रुपये, १ ते २ किलोवॅटसाठी ४२ हजार ४७० रुपये, २ ते ३ किलोवॅटसाठी ४१ हजार ३८० रुपये, ३ ते १० किलोवॅटसाठी ४० हजार २९० रुपये आणि १० ते १०० किलोवॅट, ३७ हजार २० रुपये प्रति किलोवॅटची किंमत जाहीर झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाठकबाईंची नऊवारीवरची आगळीच अदा,फोटो पाहून नेटकरी म्हणतात आम्ही होतो ‘राणा’दा…
वृषाली आणि अतुलचा अवघ्या २१ दिवसांचा संसार नदीने तिच्या पोटात सामावून घेतला
माणूस समोर गेला की मनोहरमामा त्याची संपूर्ण माहिती कसं काय सांगायचा? बिंग फुटले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.