एकेकाळी बोंबील विकणारा मन्या कसा झाला मनोहरमामा?; जाणून अटक झालेल्या मनोहर भोसलेबद्दल

भोंदूबाब लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेत त्यांना फसवत असताच्या घटना आपण अनेकदा चित्रपटात बघत असतो. खऱ्या आयुष्यातही अशा घटना घडताना आपल्याला दिसून येतात. आता असाच एक प्रकार सोलापूरच्या उंदरगावातून समोर आला आहे.

स्वत:ला बाळू मामाचा आवतार म्हणून लोकांची फसवणूक करणाऱ्या मनोहरमामाला आज अटक करण्यात आली आहे. सध्या सोलापूर, साताऱ्यात मनोहरमामाची चर्चा सुरु आहे. कॅन्सर बरा करतो म्हणून लोकांची फसवणूक करणाऱ्या मनोहरमामाला बारामती पोलिसांनी अटक केली आहे.

मनोहरमामाचं खरं नाव मनोहर भोसले आहे. मनोहर भोसलेने उंदरगावामध्ये शिवारात बाजार उभारला होता. दर अमावस्येला हा बाजार भरायचा. ३ हजार देणाऱ्यांना रांगेत तर २१ हजार देणाऱ्यांना थेट मनोहर भोसलेचे दर्शन देण्याचे यायचे. याठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या मनात मनोहरमामा म्हणजे म्हणजे बाळूमामाचं अशी धारणा निर्माण केली होती.

मनोहर भोसले हा मुळचा इंदापूरच्या लारसुणे गावातला होता. त्यानंतर तो वीस वर्षांपूर्वी उंदरगावामध्ये स्थायिक झाला होता. डीएडची परीक्षा नापास झाल्यामुळे आठवडा बाजारात तो बोंबील विकायचा. याच गावात त्यांने बंगाली शिकून आल्याचा दावा केला होता.

आजूबाजूची लोकं भूत उतरवण्यासाठी त्याच्याकडे यायची. मात्र म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने आपल्या अंगात साक्षात बाळूमामा असल्याची घोषणा केली. यावेळी त्याच्यासोबत काही साथीदारही होते.

त्यामुळे मन्या हळूहळू सदगुरु मनोहरमामा बनला होता. गावात झोपडीत राहणाऱ्या मनोहर शिवारात राहू लागला. भक्तांकडून पैसे भेटत असल्यामुळे दीड एकराच्या जातेत त्याने एक आश्रमही बांधले आणि अलिशान गाड्याही घेतल्या.

ममोहरने हा आश्रम अशा ठिकाणी उभा केला होता, ज्याठिकाणी लोकांनी चालून जाणेही कठिण व्हायचे. राजकीय लोकं, नेते मंडळी मनोहरच्या इथे डोकं टेकवायला यायची म्हणून त्याची दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे गावातील लोक महोहर भोसलेबद्दल काहीच बोलायची नाही.

स्वत:ला ज्योतिषाचार्य म्हणून घेणारा मनोहर भोसले लोकांचा रोग बरा करुन देण्याचा दावा करायचा. त्यामुळे अनेक लोक आपले आजार घेऊन मनोहर भोसलेकडे यायचे, पण जेव्हा त्याच्या आईला पॅरेलिसिस झाला तेव्हा मनोहर मामांची शक्ती कुठं गेली, असा प्रश्न लोकांनी विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता? मोदी सरकार घरबसल्या देणार ५०,००० रुपये, पण करावे लागेल ‘हे’ काम
साकीनाका बलात्काराचा तपास करण्यासाठी जोत्सना रासम यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे जोत्सना रासम
गेहना वशिष्ठ टॉपलेस फोटोमुळे झाली ट्रोल, चाहते म्हणाले, राज कुंद्राचे शूट होते का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.