अन् होळी खेळताना त्याने माझ्या स्कर्टमध्ये हात घातला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री सोफिया हयात ही तिच्या बोल्ड लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. ती सर्वाधिक लोकप्रिय ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. होळीच्या निमित्ताने तिने काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहेत.

तिचे बिकीनीतील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. काही वर्षांपुर्वी तिने बिकीनीमध्ये होळी खेळून सगळ्यांना थक्क करून सोडलं होतं. पण त्यानंतर तिने कधीच होळी खेळली नाही आणि सेलिब्रिटींच्या होळी सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला नाही.

तिने याचे कारणही सांगितले आहे. काही दिवसांपुर्वी होळी खेळताना एका व्यक्तीने तिच्या स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता. या लैगिंग गैरर्वतनामुळे तिने सेलिब्रिटींसोबत होळी खेळणे सोडून दिले आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकार होळी खेळण्यासाठी जमले होते.

या पार्टीत अनेक सर्वसामान्य लोकही जमले होते. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढत होते आणि मी ही त्यांच्यासोबत आनंदाने होळी खेळत होते. त्यावेळी एकाने माझ्यासोबत फोटो काढण्याच्या निमित्ताने माझ्या स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी मी भांगेच्या नशेत होते त्यामुळे मला जास्त काही जाणवले नाही. मी काही प्रतिकार केला नाही हे पाहून त्याची हिम्मत वाढली आणि त्याने मला उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एका पत्रकार मित्राने मला वाचवलं.

भांगेचा नशा उतरल्यानंतर मला सर्व प्रकरण लक्षात आलं. तेव्हापासून मी फक्त माझे मित्र मैत्रिणी आणि माझ्या कुटुंबियांसोबत होळी खेळण्याचा आनंद लुटते. सेलिब्रिटींच्या होळीत मी कधीच जात नाही.

महत्वाच्या बातम्या
..त्यामुळे सचिन वाझेंनी मनसुख हिरेनचा काटा काढला, अखेर खरे कारण आले समोर
‘मनसेकडून आमदारकी लढवलेल्या ‘या’ प्रसिद्ध गायिकेने केला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश’
अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनूभव; म्हणाली, रूममध्ये नेऊन…
धक्कादायक! वडिलांच्या पिस्तुलाने गोळी झाडून भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.