पुजा चव्हाणसोबतच्या ‘त्या’ फोटोबद्दल संजय राठोडांनी दिले धक्कादायक स्पष्टीकरण

यवतमाळ | गेल्या अनेक दिवसांपासून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्री संजय राठोड यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी मंत्री राठोड यांनी पुजा चव्हाणसोबत व्हायरल होत असलेल्या फोटोंवर भाष्य केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोबद्दल बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले, अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. गेली ३० वर्षे सामाजिक राजकीय जीवनात काम केले आहे.  एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करु नका असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना राठोड म्हणाले, मी विश्वासाने सांगतोय मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या तपासात सर्व गोष्टी समोर येतील. तर अरुण राठोवर बोलण्यास संजय रोठोड यांनी नकार दिला आहे.

पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांची संपुर्ण प्रतिक्रिया
पुजा चव्हाण या आमच्या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूने संपुर्ण समाजाला दुख: झाले आहे. तसेच याचे आम्हालाही दु:ख आहे आम्ही त्यांच्या चव्हाण कुटुंबीयांच्या सोबत आहोत.

पुजाच्या मृत्यूवरून घाणेरडं राजकारण केलं जात आहे. याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी भटक्या विमुक्त समाजातून, ओबीसी समाजाच नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप लावून माझं सामाजिक आणि राजकीय जीवन संपवण्यासाठी षडयंत्र केले गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
केक आणि बरंच काही! पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंनी राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
पुजाला यवतमाळला मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं; नातेवाईकांचा गंभीर आरोप
पुजा चव्हाणसोबतच्या ‘त्या’ फोटोबद्दल संजय राठोडांनी दिले धक्कादायक स्पष्टीकरण
मंत्री संजय राठोडांना पत्नीची खंबीर साथ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.