हृदयस्पर्शी चरणस्पर्श..! ‘लाईफलाईन’ रुळावर आल्यानंतर वंदन करताना सामान्य मुंबईकर, पाहा फोटो

मुंबई | मुंबई लोकलची ओळख मुंबईची लाईफलाईन अशी आहे. मुंबई लोकलसोबत मुंबईकरांच एक वेगळच भावनिक नातं आहे. ते नातं इतक घट्ट आहे की, सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा १ फेब्रुवारीला सुरु झाली. यानंतर पहिल्या प्रवासाच्या आणि लोकल ट्रेनसोबतच्या त्या पहिल्या भेटीत प्रवाशांच हे भवनिक नातं दिसून आले.

लोकलसमोर नतमस्तक झालेले प्रवाशी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या फोटोवर येणाऱ्या कमेंट हृदयस्पर्शी आहेत. तसेच सोशल मीडियावर वेगवेगळे कॅप्शन देत फोटो पोस्ट केले जात आहेत.

 

मुंबई लोकलच्या प्रवाशांनी अनेक प्रतिक्रिय दिल्या आहेत. यामध्ये ‘ज्या गोष्टीमुळे पोटाची भूक मिटते, त्या गोष्टीला वदंन करताना एक सामान्य मुंबईकर’, ‘हिचा म्हणजे लोकल अन् लोकलसेवेची जाण आणि आयुष्यावर होत आलेले उपकार कसे तर ते पाय ठेवण्यापूर्वी हृदयस्पर्शी चरणस्पर्श…”ही” नव्हती तर जवळजवळ आयुष्य उध्वस्त होण्याची वेळ आली होती…उशीराने का होईना नवीन उमेद अपेक्षा ठेवून जीवन जगण्याचा मार्ग सुरू झाला…’, लोकल यापुढे अशीच अखंड चालू राहू दे हीच प्रार्थना. अशा प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करत आहेत.

तसेच काही लोकांनी १२ ते ४ यादरम्यान ठेवलेल्या वेळेवर टीका केली आहे. उशीरा का होईना लोकल सुरू होत असल्याने मुंबईकरांच्या चेहऱ्यावर हस्य उमलले आहे. परंतु मुंबईकरांनी लोकल ट्रेन प्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेला सलाम.

महत्वाच्या बातम्या-
लोकल सेवेच्या वेळापत्रकात होणार बदल? राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा
मुंबईकरांना मोठा दिलासा! ‘१ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल प्रवास करता येणार, पण…
मुंबईच्या लाइफलाइनसाठी ‘चेन्नई पॅटर्न’, मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार पण..
मुंबई लोकलमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी राज्य सरकारने आखला ‘मास्टर प्लॅन’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.