केकऐवजी फळ कापून वाढदिवस साजरा करा, सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी ट्रेंड

पुणे | वाढदिवस साजरा करण्यासाठी केक तर पाहिजेच असतो. केकला वाढदिवसाचे विशेष आकर्षण मानले जाते. यासाठी बाजारात अनेक प्रकारचे केक मिळतात. परंतु सोशल मीडियावर एका विशिष्ट प्रकारच्या केकच्या मागणीने जोर धरला आहे. हा केक क्रिम किंव मैद्याचा नसून तो फळांचा आहे.

सोशल मीडियावर आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या फळांच्या केकची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. नेटकरी आपले मित्र, नातेवाईक आणि परिचयाच्या व्यक्तींना फळाचा केकच वाढदिवसाला आणा असं आवाहन करत आहेत. यामुळे याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आणि आपल्या आरोग्याला होणार असल्याचे म्हटले जात आहे.

सोशल मीडियात अनेक ट्रेंड चालवले जातात. यामधील सर्वच ट्रेंड लोकांना आवडतील असे होत नाही. परंतु सध्या सोशल मीडियावर केकच्या बाबतीत पडलेला ट्रेंड सगळ्यांच्याच पसंतीस पडत आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी अनेक फळांच उत्पादन घेतात. यामध्ये कलिंगड, चिकू, पेरू, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, पपई ही फळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पिकवली जातात. बाजाराच्या मागणीवर शेतकऱ्यांना मिळाणारे पैसे अवलंबून असतात. त्यामुळे हा ट्रेंड आपण सर्वांनी मिळून सुरू केला आहे. तो आपणच मोठा करूया अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

केमिकल्स मिश्रीत क्रिमचा केक खाण्याऐवजी फळांचा केक संकल्पना चांगलीच लोकप्रिय होत आहे. याला निरोगी जगण्यासाठीची प्रेरणा म्हणावी लागेल. अनेक लोक सोशल मीडियावर केक कसा बनवता येईल याबद्दल विचारणा करत आहेत. अनेकांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
जेव्हा लाखोंच्या सभा गाजवणाऱ्या आचार्य अत्रेंनी मागितली होती यशवंतरांव चव्हाणांची माफी
तैमूर गाडीतून उतरताच भडकला, आणि थेट काचेवर जाऊन धडकला, पाहा व्हिडिओ
काय सांगता! बजरंगबलीच्या नावाने बनवण्यात आलं रेशनकार्ड, महिन्याला घेत आहेत गहू, तांदळाचा लाभ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.