#coronavirus : कोरोनापासून बचावासाठी ‘हा’ नियम पाळावाच लागणार; घ्या जाणून

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनावरील लस अजूनही बाजारात आलेली नाहीये. त्यामुळे आपण सध्या मास्कच्या मदतीने घराबाहेर पडत आहोत. सुरक्षित अंतर, स्वच्छता पाळून आपण सर्वजण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत.

अशातच कोरोनापासून वाचण्यासाठी आणखी एक नियम आपल्याला पाळावा लागणार आहे. मास्क, फेसशिल्डसारख्या उपायांमुळे संसर्गाचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. पण सुक्ष्म कणांची गळती रोखता येऊ शकतं नाही. त्यासाठी दोन फुटांपर्यंत सोशल डिस्टेंसिंग पाळणं महत्वाचे असल्याचे संशोधनातून सांगण्यात आले आहे.

याबाबतचे संशोधन आयटीआय भुवनेश्वरच्या संशोधकांकडून करण्यात आले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून असे सांगण्यात आले आहे की, खोकताना किंवा शिंकताना बाहेर येत असलेले ड्रॉपलेट्स २५ फुटांपर्यंत दूर जाऊ शकतात. यामुळे मास्क आणि फेसशिल्ड लावल्यानंतरही शिंकताना नाकाला हात किंवा कोपराने झाकून घ्या.

कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार…
मास्क, सॅनिटायझरनंतर आता कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार करण्यात आले आहे. बर्मिंघम युनिव्हर्सिटीने हे अँटी-कोव्हिड नेझल स्प्रे तयार केले आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, हा नेझल स्प्रे दोन प्राथमिक मार्गाने काम करतो. प्रथम तो नाकाच्या आत विषाणूला पकडतो आणि त्याच्याभोवती नाकातच वेष्टन तयार करतो.

युनिव्हर्सिटीच्या हेल्थकेअर टेक्नॉलॉजीज इन्स्टिट्युटमधील पथकानं यूके, युरोप आणि अमेरिकेतील नियामक संस्थांनी पूर्वीच मंजूर केलेले साहित्य वापरून हा नेझल स्प्रे बाजारात आणण्यासाठी तयार आहे. या स्प्रेसाठी वैद्यकीय उपकरणं, औषधं आणि अगदी अन्न उत्पादनांमध्ये वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, स्प्रेमध्ये वापरलेलं सोल्युशन कोरोनाचा संसर्ग परसरवणाऱ्या सेल कल्चरला ४८ तासांपर्यंत रोखून ठेवते, असे संशोधकांनी सांगितले. याचबरोबर संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्या किंवा खोकल्याद्वारे दुसऱ्याकडे प्रसारित झाला तरीही त्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
संजय राऊत यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा, म्हणाले…
“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”
बॉलीवूड उत्तर प्रदेशला हलवण्याच्या प्रक्रियेला वेग, योगी आदित्यनाथ यांनी घेतली अक्षय कुमारची भेट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.