आता सोशल डिस्टन्स पुरेस नाही, कोरोना हवेतूनही पसरतो, लॅन्सेटच्या अहवालामुळे खळबळ

देशात कोरोनाने सर्व विक्रम मोडले असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. अनेक रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन मिळत नाही. अनेकांचे यामुळे मृत्यू होत आहेत. आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला असून परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.

असे असताना आता अजून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सर्व जग याबाबत काळजी घेत असताना अशात लॅन्सेटच्या अहवालामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

जगभरात लॉकडाऊन लावले, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले, मास्क घातले, मात्र कोरोना अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. अशात लॅन्सेटच्या अहवालामुळे एकच खळबळ उडाली आहे. करोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे. कोरोना हवेतून पसरत असल्याचा पुरावा असल्याचा दावा या समितीने केला आहे. सहा तज्ज्ञांच्या समितीने सखोल अभ्यास करून अहवालात हा दावा केला आहे.

या समितीत अमेरिका, इंग्लंड, कॅनडामधील तज्ज्ञांचा समावेश आहे. यात रसायनशास्त्रज्ञ जोस लुईस जिमेनेज यांचाही समावेश आहे. ते कॉऑपरेटिव्ह इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन इनव्हारनमेंटल सायन्स आणि कॉलोरांडो विद्यापीठात कार्यरत आहेत. यामुळे चिंतेत अजून भर पडली आहे.

त्यामुळे मोठ्या ड्रॉपलेटपेक्षा हवेतून सर्वात जास्त वेगाने कोरोनाचे फैलाव होत असल्याचे मत या अहवालात मांडण्यात आले आहे. यामुळे आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे आता गर्दीच्या ठिकाणी जाणे आपल्याला टाळावे लागणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.