‘हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा’

मुंबई | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.

सोबतच दहा जणांना पद्मभूषण आणि १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) यांच्यासह तारलोचन सिंह, रजनीकांत श्रॉफ, कालबे सादिक (मरणोत्तर), केशूभाई पटेल (मरणोत्तर), नृपेंद्र मिश्रा, चंद्रशेखर कांबरा, तरुण गोगई (मरणोत्तर), कृष्णन नायर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

त्यामध्ये, महाराष्ट्रातील ६ जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून राज्य सरकारने शिफारस केलेल्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी या पुरस्कारावर आपली भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हा पुरस्कार मला सहकार्य करणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी नागरिकांना त्यांच्या अनाथ मुलांचे गणोगत होण्याचेही आवाहन केले.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या, ‘माझी प्रेरणा, माझी भूक ही पोटाची, भाकरीची. मी भाकरीला धन्यवाद देते कारण भाकरीच मिळत नव्हती. माझ्या लेकरांना भाकरी मिळावी म्हणून रानोरान फिरले. लोकांनी मला सहकार्य केले. त्यावेळी देणाऱ्यांचे, त्या काळात ज्यांनी माझी झोळी भरली त्यांचे आणि मला जगण्याचं बळ दिले त्या माझ्या लेकरांचा या पुरस्कारावर अधिकार आहे, उरलासुरला माझा.’

महत्त्वाच्या बातम्या
खास कॅप्शनसह वरुणने शेअर केले लग्नाचे फोटो; ‘या’ शब्दात केलेय बायकोचे कौतूक..
पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा! ‘बर्ड फ्लू’साठी मिळणार मदत, वाचा काय म्हणाले मंत्री…
शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.